आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये तीन तासांत ४० मि.मी. पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या औरंगाबादकरांना शनिवारी पहाटे पावसाने सुखद धक्का दिला. पहाटे अडीच ते साडेपाचदरम्यान मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. चिकलठाणा वेधशाळेने ४० मिमी पावसाची नोंद केली आहे. मात्र पावसाचे वितरण सारखे नव्हते. केवळ चिकलठाणा परिसर आणि सिडकोतच पाऊस झाला.

गेल्या दोन दिवसांपासून अाभाळात ढग दाटू लागले होते. परंतु शनिवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. शहरातील काही भागांतच पावसाचा जोर होता. सिडको भागात साडेतीनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू होताच अवघ्या काही मिनिटांतच या भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल दीड तासाने तो पूर्ववत झाला. शहारातील अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू होता. कोठे पाऊस तर कोठे कोरड सातारा परिसरात पहाटेच्या सुमारास पावसाची रिमझिम होती. शहरातील काही भागांत पाऊस झाला तर काही ठिकाणी कोरड होती. उस्मानपुरा सर्कलमध्ये १९ मिमी तर औरंगाबाद ४, चौका २०, हर्सूल ०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.