आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

40 टक्के विद्यार्थी राष्ट्रगीतात नापास, सर्वेक्षणाचा निष्‍कर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी शाळेत राष्ट्रगीत न येणे हे विद्यार्थ्यांनाच अपमानास्पद वाटायचे. प्रार्थनेच्या वेळेस राष्ट्रगीत गाताना विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असायचा, पण काळ बदलला आणि शाळेत बँड पथकाच्या तालावर गायल्या जाणार्‍या राष्ट्रगीताची जागा सीडीच्या धूनने घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत पाठ करण्याची आवश्यकता भासत नाही. ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे राष्ट्रगीत गायले जात आहे. त्यात एकसारखेपणा उरला नसल्यामुळे ते विद्यार्थ्यांना पाठ होत नाही. त्यातील शब्दांचे उच्चार चुकत आहेत. डीबी स्टारने यामागच्या कारणांचा मागोवा घेणारी माहिती 13 ऑगस्ट रोजी पहिल्या भागात प्रसिद्ध केली. त्यात अनेक मान्यवरांनी पारंपरिक 52 सेकंदांचे राष्ट्रगीतच वाजवले जावे, तसे न केल्यास मुलांना राष्ट्रगीत पाठ होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यानंतर डीबी स्टारने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सर्वांना विचार करायला भाग पाडणारे आहेत.

असे केले सर्वेक्षण
चमूने शहरातील 10 शाळांना अचानक भेटी दिल्या. यात 3 इंग्रजी, 3 मराठी, 3 सेमी इंग्रजी माध्यमाच्या, तर मनपाच्या एका शाळेचा समावेश आहे. या सर्व शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी 15 ते 20 मुलांची निवड केली. चौथी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांना एक-एक करून राष्ट्रगीत गायला सांगण्यात आले. तसेच त्यांना तीन प्रश्न विचारण्यात आले. दुसरीकडे 50 सर्वसामान्य नागरिकांनाही ही प्रश्नावली देऊन राष्ट्रगीत गायला लावले.

या शाळांचा समावेश
सेंट झेवियर्स, पोदार इंटरनॅशनल, सेंट फ्रान्सिस, स. भु. प्रशाला, ब्रिलियंट् किड्स, अनंत भालेराव विद्या मंदिर, अमानविश्व हायस्कूल, सेंट लॉरेन्स, मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, प्रियदर्शिनी इंदिरानगर आदी शाळांचा समावेश होता.

मनपाची शाळा सरस..
डीबी स्टार चमूने मुलांकडून राष्ट्रगीत म्हणून घेत असताना आलेले निष्कर्ष पाहून विद्यार्थी, शिक्षक स्तब्ध झाले. मात्र, चमू इंदिरानगर येथील मनपाच्या केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोहोचला. या वेळी शाळा सुटली होती. मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी गाडी पाठवून घरी जाणार्‍या मुलांना परत बोलावले. या सर्वच मुलांनी एकही चूक न करता पूर्ण आत्मविश्वासाने राष्ट्रगीताचे गायन केले हे विशेष.


माहिती घ्यावी लागेल
मल्टिप्लेक्समध्ये कोणत्या प्रकारचे राष्ट्रगीत वाजवले जाते, याची मला माहिती नाही. ते आपल्या मर्जीप्रमाणे सीडी लावतात. याची नेमकी माहिती घेतो.
राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन)


तयारी करून घेणार
डीबी स्टारमुळे आम्हाला आमच्या मुलांच्या चुका लक्षात आल्या. 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येकाकडून अचूक राष्ट्रगीत म्हणण्याचा सराव करून घेऊ.
रिना मगर, मुख्याध्यापक, ब्रिलियंट किड्स स्कूल


तयारी करून घेणार
डीबी स्टारमुळे आम्हाला आमच्या मुलांच्या चुका लक्षात आल्या. 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येकाकडून अचूक राष्ट्रगीत म्हणण्याचा सराव करून घेऊ.
रिना मगर, मुख्याध्यापक, ब्रिलियंट किड्स स्कूल.


आम्ही मेहनत घेतो
मनपा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण आमची मुले मेहनती आहेत. आम्ही त्यांच्यातील अन्य कलागुणांना चालना देण्यासाठी मेहनत घेतो.
संजीव सोनार, मुख्याध्यापक, मनपा केंद्रीय विद्यालय, इंदिरानगर

निष्कर्ष
या प्रश्नांना शालेय विद्यार्थ्यांनी थेट हो, असे उत्तर दिले; पण प्रत्यक्ष राष्ट्रगीत गाताना त्यांचे बिंग फुटले. नागरिकांनी मात्र थेट येत असल्याचे सांगणे टाळले.
> 100 टक्के शहरवासीयांनी राष्ट्रगीत येत असल्याचे सांगितले, पण 48 टक्के लोकांनीच ते पूर्ण पाठ असल्याचे मान्य केले. काही शब्द अडखळत असल्याचे ते म्हणाले.
> आणखी धक्कादायक बाब म्हणजे पाठ असणार्‍या 48 टक्क्यांपैकी केवळ 33.33 टक्के लोकांनीच राष्ट्रगीत गाता येत असल्याचे सांगितले. कदाचित यापेक्षा अधिक नागरिकांना राष्ट्रगीत येत असावे, परंतु त्यांनी एकट्याने राष्ट्रगीत गाणे टाळले.