आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहयोच्या कामांवरील 40 हजार मजूर वाढले, राेहयो अधिकाऱ्यांनी केला दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतर मराठवाड्यात रोहयोच्या मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. ११ एप्रिलअखेर मराठवाड्यातील कामांवर ५७५८९ मजुरांची उपस्थिती आहे. मराठवाड्यात सध्या सेल्फवरील लाख २१ हजार कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
 
मार्चमध्ये मनरेगा सप्ताह सुरू केल्यानंतर मराठवाड्यातील मजुरांची संख्या ४० हजाराने वाढल्याचा दावा रोहयोचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुंभार यांनी केला. उन्हाळ्यात शेतीची कामे नसल्यामुळे रोहयोच्या कामांना मागणी वाढते. यंदा दुष्काळ नसताना मराठवाड्यात ५७ हजार मजूर रोहयोच्या कामावर असून मनरेगा प्रभावीपणे राबवण्याबाबत मराठवाड्यात जनजागृती केल्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
बीड जिल्ह्यात सर्वाधिक मजूर: मराठवाड्यातसर्वाधिक मजूर बीड जिल्ह्यात आहेत. बीड जिल्ह्यातील ३२३ ग्रामपंचायतींत ११७१ कामे सुरू असून २०७९१ मजूर उपस्थित आहेत. लातूर जिल्ह्यातील २८२ ग्रामपंचायतींपैकी ११०१ गावात कामे सुरू असून या कामांवर १३२०२ मजूर उपस्थित आहेत. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी १०२० मजुरांची उपस्थिती असून या जिल्ह्यात रोहयोची फक्त ७३ कामे सुरू आहेत.
 
औरंगाबाद जिल्ह्यात ६,५०० मजूर: औरंगाबादजिल्ह्यात २०३ ग्रामपंचायतींची ७५६ कामे सुरू असून ६८३७ मजूर या कामांवर राबत आहेत. जालना जिल्ह्यातील २५८ कामांवर ४६००, नांदेड जिल्ह्यात ३८९ कामांवर ५९०१, परभणी ३२०२ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात २०३६ मजूर कामावर आहेत.
 
सप्ताहामुळे वाढले मजूर
मनरेगासप्ताह सुरू होण्यापूर्वी मार्च रोजी मराठवाड्यातील रोहयो कामांवरील मजुरांची संख्या १७१७१ होती. बीड १२४७,लातूर ४४३,लातूर ३११६, नांदेड ५६६०, जालना ८९६, परभणी ४०३५,उस्मानाबाद १५६० तर हिंगोली जिल्ह्यात मजुरांची संख्या २१३ होती.
 
२३ मार्च रोजी मराठवाड्यातील मजुरांचा आकडा वाढून २५२८३ पर्यंत पोहोचला. त्यानंतर ११ एप्रिल रोजी मजूर उपस्थितीचा आकडा ५७५८९ इतका झाला असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुंभार यांनी दिली.
 
संख्या आणखी वाढणार
विभागीय आयुक्तांनी सुरू केलेला मनरेगा सप्ताह आणि त्याचा सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे सव्वा महिन्यांत मजुरांची संख्या १७ हजारांवरून ५७ हजारांपर्यंत गेली आहे. रोहयोच्या कामांच्या नियोजनामुळे मजुरांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- आनंद कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो
बातम्या आणखी आहेत...