आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाडची पुनरावृत्ती टळली; 40 वर्षे जुना पूल मधोमध तुटला, बससह 25 प्रवासी बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- महाड मधीलपूल कोसळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावर मोढावाडी फाटा रस्त्यावरील ४० वर्षे जुना १० ते १२ फूट उंचीचा पूल सोमवारी अचानक मधोमध तुटून कोसळला. यामुळे पुलावरून जाणऱ्या दोन दुचाकींवरील चार जण जखमी झाले. त्यापाठोपाठ जाणाऱ्या बसचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. बसमध्ये २५ प्रवासी होते. नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले.

सिल्लोडपासून 4 किमी अंतरावर मोढावाडी फाट्यावरील पूल सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळला. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या दोन दुचाकींवरील जण जखमी झाले. पाठोपाठ सिल्लोड-म्हसला-टाकळी बस जात होती. पूल कोसळताना पाहून बसचालक वसंत गावंडे यांनी अलीकडेच बस थांबवली. काही सेकंदांचा उशीर झाला असता तर मोठा अपघात झाला असता. काही क्षणांतच चालक वाहक पंढरीनाथ सपकाळ प्रवाशांनी दुचाकीवरील जखमींना बाहेर काढले.

> हा पूल ४० ते ४५ वर्षांपूर्वी डबर चुन्यात बांधण्यात अाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे
शाखा अभियंता सुनील देवरे यांनी सांगितले.

>दुसरीकडे, पुलाचे बांधकाम ४० वर्षांपूर्वीचे असल्याने त्याची वयोमर्यादा काढावी लागेल, असे कार्यकारी अभियंता वैशाली गाडेकर म्हणाल्या.

पुढील स्लाइडवर पाहा, कोसळलेल्या पुलाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...