आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगड, चुन्याच्या बांधकामाचा पूल वाहतुकीसाठी खुला कसा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- चाळीस वर्षांपूर्वी दगड अाणि चुन्यात बांधकाम असलेला पूल त्या काळच्या वाहतुकीला डोळ्यासमोर ठेवून केला होता. त्या तुलनेत चाळीस वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली. हा पूल आजच्या वाहतुकीसाठी पोषक नाही, असे स्पष्ट होत असताना या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट का करण्यात आले नाही, असा सवाल सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. त्यात हा पूल त्या काळच्या वाहतुकीच्या दृष्टीने तयार केला होता.

त्या तुलनेत आजच्या वाहतुकीचा भार खूप मोठा असल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकुंद सुरकुटवार यांनी दिली. तसेच आठ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील पखानी नाल्यावरील कोसळलेल्या पुलाचे नव्याने काम हाती घेण्याचे आदेश सुरकुटवार यांनी दिले.

सिल्लोड शहरापासून चार किमी अंतरावर मोढावाडी फाट्यावरील पखानी नाल्यावरचा पूल सोमवारी (५ सप्टेंबर) तुटून कोसळला. या घटनास्थळाला भेट देऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी रात्रीतून तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्याच्या कामाची पाहणी मंगळवार, दि.६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुरकुटवार यांनी केली. अधीक्षक अभियंता ए.बी.सूर्यवंशी, उपअभियंता नामदेव मोगल त्यांच्यासोबत होते.

पुलाची पाहणी केल्यानंतर बोलताना सुरकुटवार म्हणाले, जुने बांधकाम असल्याने पूल कोसळला आहे. उपलब्ध निधीनुसार पुलांची कामे करण्यात येत आहेत. या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नव्याने पूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आदेश देतानाच दोन दिवसांत परिसरातील पुलांची पाहणी करून अहवाल देण्यासही त्यांनी सांगितले.

रात्रीतून पर्यायी रस्ता
पखानी नाल्यावरील पूल कोसळल्याने तालुक्यातील तीस गावांसह कन्नड, चाळीसगावकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करण्याचे काम बांधकाम विभागाने रात्री हाती घेऊन सकाळी चार वाजेपर्यंत तात्पुरता रस्ता तयार केल्याने वाहतूक सुरू झाली. यासाठी शिवसेनेचे नेते सुनील मिरकर यांच्यासह बांधकाम विभागाच्या गुत्तेदाराने मदत केली. संजय गांधी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी सुरकुटवार यांची भेट घेऊन जखमी झालेल्या नागरिकांजवळ उपचारासाठी पैसे नसल्याने बांधकाम विभागाने खर्च उचलण्याची मागणी केली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, कोसळलेल्या पुलाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...