आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

434 फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने वसूल केले दीड लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दक्षिणमध्य रेल्वे विभागाच्या पथकाने शनिवारी राबवलेल्या विशेष तपासणी माेहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४३४ प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंडापोटी लाख ४६ हजार रुपये वसूल केले. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी “दिव्य मराठी’ला ही माहिती दिली.
 
विनातिकीट प्रवास करून रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवत असते. ऑगस्टला पहाटे वाजेपासून रेल्वे तपासणी सुरू करण्यात आली. परभणी ते परळी मार्गावर धावणाऱ्या रेल्वेेमध्ये अचानक धाडी टाकून तिकीट तपासणी करण्यात आली. यात ४३४ विनातिकीट सापडलेल्या ४३४ प्रवाशांकडून दिवसभरात एक लाख ४६ हजार रुपये वसूल करण्यात आले. या मोहिमेत वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, सहायक वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप कुमार, अंजी नायक यांच्यासह सहायक कार्मिक अधिकारी, २३ तिकीट तपासनीस, कार्यालयीन कर्मचारी आणि १३ रेल्वे पोलिस फोर्सचे जवान सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...