आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४४ तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
औरंगाबाद- जुलैमहिना संपत आला तरी पाऊस पडल्याने मराठवाड्यातील ४४ तालुक्यांत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या तालुक्यांत येत्या चार दिवसांत पाऊस पडला नाही तर खरिपाचे पीक हाती लागणार नाही, अशी चिंता कृषी अभ्यासक विजयअण्णा बोराडे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्ती केली.
मराठवाड्यात सात जूनला पाऊस सुरू झाला. १९ जूननंतर पावसाने दडी मारली. तब्बल महिनाभरापेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतरही मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक मराठवाड्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
या तालुक्यांत सर्वात कमी पाऊस

मराठवाड्यात४४ तालुक्यांत ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये शिरूर कासार तालुक्यात तर फक्त २४ मिमी (८.४ टक्के) आणि गेवराईमध्ये ३७ मिमी (१७.८) कमी पाऊस झाला आहे. तर सोनपेठ ६७ (२१), उस्मानाबाद ७० (२३ टक्के), पाटोदा ७० ( २८), शिरूर अनंतपाळ ७० (१८), पाथरी ७२ (२६), कळंब ७३ (२६), तुळजापूर ७८ (२६), धारूर ७९ (२९), केज ८२ (३०), वाशी ८४ (३०), जिंतूर ८६ (३१), भूम ८९ (२९), गंगाखेड ९१ (२८), परभणी ९३ (२६), बीड ९४ (४१), घनसावंगी ९५ (३७), चाकूर ९६ (२७), औसा ९७ (३६), पैठण ९७ (४०), अहमदपूर १०२ (४०), लातूर १०५ (३९), निलंगा १०८ (३२), आष्टी १०९ (४६), माजलगाव १०९ (३४), परळी १११ (२९), अंबाजोगाई ११२ (३९), रेणापूर ११७ (४०), परंडा ११८ (५१), उमरगा ११९ (३९), अंबड १२३ (४८), वडवणी १२४ (४२), सेलू १२७ (४६), वसमत १२८ (३२), लोहारा १३३ (४४), मानवत १३३ (३८), पालम १३४ (३९), पूर्णा १३४ (३९), बदनापूर १४५ (४२), सोयगाव १५३ (४९) अशी परिस्थिती आहे.

खरिपाचे नुकसान
एकीकडेधरणातला पाणीसाठा पाच टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे खरिपाची गंभीर स्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे. कमी पावसाचा फटका मूग, कापूस, तूर, सोयाबीन यासह खरिपाच्या सर्व पिकांना बसला आहे. कमी पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पेरण्या वाया गेल्या आहेत.

५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान
^कमीपावसामुळे हलक्या जमिनीवरील शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दुबार पेरणीची शेतकऱ्यांची ताकद उरलेली नाही. तसेच दुबार पेरणीलाही मर्यादा आहेत. आगामी चार दिवसांत पाऊस आल्यास उर्वरित पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मूग, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाऊस झाल्यास कापसाला मोठा फटका बसेल. चाऱ्याची समस्यादेखील वाढणार आहे. विजयअण्णाबोराडे, कृषितज्ज्ञ

या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती
मराठवाड्यातीलबीड, परभणी, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. बीडमध्ये १११ मिमी (३२ टक्के) उस्मानाबादमध्ये ९५ मिमी (३३ टक्के ), तर परभणीत १०४ (३३.७) आणि लातूरमध्ये १२० (३८) मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जालन्यामध्ये १४३ (४९ टक्के) पाऊस पडला असून जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.