आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 45 Year Old Women Murder At Aurangabad, Asaram Bapu Ashram

आसारामबापू आश्रमाजवळ महिलेवर बलात्कार करून खून, मृतदेह झाडावर टांगला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेळ्या चारणाऱ्या ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून खून करण्यात आला. नंतर तिच्या साडीने मृतदेह झाडाला लटकवण्यात आला. बेगमपुरा भागातील आसारामबापू आश्रम परिसरात ही घटना घडली.

मिटमिटा येथील अमिनाबी शेख मुस्ताक ही गुरुवारी बेगमपुरा भागातील गायरानात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. सायंकाळी बकऱ्या घरी परतल्या. मात्र, अमिनाबी आली नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्यात आला. शेवटी शेख मुस्ताक यांनी छावणी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली. शुक्रवारी आसारामबापू आश्रमाजवळ अमिनाबीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला
या खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त रामराव हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, गौतम फसले, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश दांडगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अमिनाबीचा मृतदेह ओढत झाडाखाली नेण्यात आल्याच्या खुणा जमिनीवर दिसत होत्या.

बलात्काराचागुन्हा : अमिनाबीयांचा बलात्कारानंतर गळा दाबून खून केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी खून बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गौतम फसले करत आहेत.
आत्महत्येचा बनाव
अमिनाबीचीछत्री, डब्बा चपला झाडाखाली ठेवण्यात आल्या. तिने फाशी घेतल्याचे भासवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. दोनपेक्षा जास्त आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस काही गुराख्यांची माहितीही घेत आहेत.