आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरके गृह प्रकल्पातील ४५० फ्लॅट अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ हिरापूर येथे उभारण्यात आलेल्या ‘आर.के. फोर्थ डायमेन्शन’ या ४५० फ्लॅटच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम अनधिकृत असल्याने ते तातडीने पाडून टाकावे, अशा आशयाची नोटीस सिंडकोच्या नगररचना अधिकाऱ्यांनी प्रकल्प विकासकांना बजावली आहे. त्यामुळे हे फ्लॅट विकत घेणाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रादेिशक व नगर रचना अधिनियम १९६६च्या कलम क्रमांक ५२(१) नुसार आर. के. कॉन्स्ट्रो प्राॅजेक्ट प्रा. िल. यांना ही नोटीस २२ ऑगस्ट रोजीच बजावण्यात आली आहे. त्यात हिरापूर येथील सर्व्हे क्रमांक ३० धील हा प्रकल्प अनधिकृत ठरवण्यात आला आहे. परवानगीपत्रातील अटी, शर्तींचा भंग करण्यात आल्यामुळे ३१ दविसांच्या आत विकासकाने हे बांधकाम काढून टाकावे, असे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जर स्वत:हून हे बांधकाम पाडले नाही तर सिंडको ते पाडेल असेही नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ४५० पैकी ८० टक्के फ्लॅट्स संबंधित विकासकांनी विकले आहेत. जर सिंडकोने ही कारवाई केली तर या फ्लॅट खरेदी करणाऱ्यांची अवस्था काय होईल, हा प्रश्न िनर्माण झाला आहे. बांधकामाच्या मान्यतेसाठी म्हणून बिल्‍डरने ५९ लाख ५२ हजार २५० रुपये भरायचे होते. मात्र, आतापर्यंत केवळ ३ लाख ७२ हजार २५० रुपये भरले असल्याची माहिती सिंडकोकडून देण्यात आली आहे.

कारवाई करणार
आर. के. बिल्‍डरला नोटीस बजावली असून त्यांच्या भूमिकेवर पुढील कारवाई अवलंबून असेल. आम्ही दिलेल्या मुदतीत संबंधित विकासकाच्या उत्तराची वाट पाहत आहोत. त्यानंतर सिंडको पाऊल उचलेल. सर्वसामान्यांच्या बाजूने सिंडको आहे.
सुनील केंद्रेकर, मुख्य प्रशासक, सिडको.

नवा आराखडा दिला
आम्हाला नोटीस मिळाली असून सिडकोच्या सदस्यांनी प्रकल्पाची पाहणी केली आहे. त्यांना आम्ही नव्याने आराखडा सादर केला आहे.
समीर मेहता, संचालक आर. के. कॉन्स्ट्रो