आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४८ जणांनी केले वॉटर हार्वेस्टिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी सातारा, देवळाई, सिडको, हडको, पडेगाव, गारखेड्यातील ४६ जणांनी पावसाळ्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतले आहे.
जलपुनर्भरण अत्यल्प आणि पाणी उपसा अमर्याद होत असल्याने बोअरवेल, विहिरी, लहान-मोठे प्रकल्प भूगर्भातील पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी मान्सूनपूर्व रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, असे आवाहन "दिव्य मराठी'ने जून रोजी वृत्ताच्या माध्यमातून केले होते. त्याची दखल शेकडो नागरिकांनी घेतली असून प्रत्यक्षात ४६ जणांनी अंमलबजावणीही केली.

३५ जणांचे हार्वेस्टिंग
४०दिवसांत शहरातील विविध भागांत आमच्या टीमने ३५ इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेे. तीन वर्षांत सुमारे ४०० इमारतींवर हार्वेस्टिंग केले आहे. ६५० स्क्वेअर फुटांच्या इमारतीवर ६५०० रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. किशोरपवार, श्रेयसमल्टी सर्व्हिसेस.

लवकरच निर्णय घेऊ
शहरातील किती इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे, याविषयी माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सांगतो. जे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर सक्तीचे पाऊलही उचलले जाईल. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांत बैठक बोलावली जाईल. त्र्यंबकतुपे, महापौर.

पुढे काय?
नळालाचार दिवसांआड पाणी मिळत असल्याने लोक हार्वेस्टिंगकडे फारसे लक्ष देत नाहीत. हार्वेस्टिंग बंधनकारक असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे हार्वेस्टिंगचे प्रमाण केवळ टक्के आहे. दुसरीकडे दुष्काळामुळे भूजलपातळी २०० ते ४०० फुटांपेक्षा खोलवर गेली आहे. नदी, नाल्याला पूर येत नाही. सरासरीपेक्षा ४० ते ५५ टक्के पाऊस कमी पडत असल्याने जायकवाडीत अल्प साठा उरला आहे. हर्सूल तलाव कोरडा आहे. याचे सर्वांनी भान ठेवून लोकसहभागतून हार्वेस्टिंगला महत्त्व देणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...