आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो क्लस्टरला रु.५‌ कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: औद्योगिक प्रदर्शनाची पाहणी करताना मुनगंटीवार, संरक्षणमंत्री पर्रीकर. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद - मराठवाडा ऑटो क्लस्टरला पाच कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केली. वाळूज येथे उद्योजकांतर्फे आयोजित सेंटर फॉर एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुनगंटीवार म्हणाले की, अॉटो क्लस्टरसाठी ताजमहाल उभारणीपेक्षा चौपट वेळ लागतो. मात्र, औरंगाबादच्या उद्योजकांनी एकत्रित काम करून उत्तम क्लस्टर सुरू केले आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेच. शिवाय राज्यात बंद पडलेले ३३ हजार उद्योग सुरू करण्याकरिता राज्य सरकार धोरण आखत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांचे वीज बिल कमी करण्यासाठीही विचार होत आहे.

मेक इन इंडियासाठी खासगी उद्योगांनी पुढे यावे : प्रभू म्हणाले की, मेक इन इंडियासाठी खासगी उद्योगांनी पुढे यावे. जागतिक पुरवठादार साखळीत सहभागी होण्याची तयारी दाखवावी. एकमेकांच्या हातात हात घालून काम कसे करता येते हे औरंगाबादच्या उद्योजकांनी ऑटो क्लस्टरच्या उभारणीतून दाखवून दिले आहे. आता जागतिक पातळीवर स्पर्धा करून आपली उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची गरज आहे. रेल्वेसाठी लागणारे सुटे भाग, यंत्रे देशातच तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा. वाजपेयींच्या काळातील निर्णयांच्या धर्तीवर मेक इन इंडियाचे परिणामही आगामी काळात पाहायला मिळतील.

पवारांची घोषणा अन्
ज्येष्ठ उद्योजक राम भोगले म्हणाले की, ऑटो क्लस्टरचा प्रकल्प प्रस्ताव सर्वात अाधी औरंगाबादने तयार केला. मात्र, त्यास सर्वात शेवटी मंजुरी मिळाली. सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार असून त्यासाठी ५ कोटी रुपये मदतीची गरज आहे. यापूर्वीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मदत जाहीर केली; पण तो अर्थ व उद्योग मंत्रालयात ताळमेळ नसल्याने मिळालाच नाही. आता ही रक्कम कर्ज स्वरूपात द्या. आम्ही ती दहा वर्षांत परत करू. सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले. सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी आभार मानले.