आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्टअप, स्टँॅडअप उद्योजकांसाठी वाळूजमध्ये 5 कोटींचे प्रशिक्षण केंद्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्टार्टअप, स्टंॅडअप या दोन शासकीय योजनेत उद्योग सुरू करण्याऱ्या उद्योजकांना मार्गदर्शन देण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अंॅड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) ही उद्योजकांची संघटना केंद्र उभारणार आहे. सप्टेंबरपासून हे केंद्र वाळूजमधील ऑटोक्लस्टरमध्ये सुरू होणार आहे. पाच वर्षांत या केंद्रावर पाच कोटी रुपये खर्च केले जाणार असून उद्योग सुरू करणाऱ्यांना दरमहा ३० हजार रुपये भत्ता सरकार देणार आहे. अशी माहिती सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी दिली. 

सीएमआय या संघटनेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेताच उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला या वेळी उपाध्यक्ष रितेश मिश्रा,सचिव व्ही.एन.नांदापूरकर माजी अध्यक्ष आशिष गर्दे यांची उपस्थिती होती.वर्षभरात अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काय कामे करणार याचा कलमी कार्यक्रमच कोकीळ यांनी सांगितला. ते म्हणाले की, स्टार्टअप स्टंॅडअप योजनांसाठी राज्यातील पहिले इन्क्युबेशन सेंटर सीएमआयए राज्यसरकार यांच्या माध्यमातून सुरू केले जाईल.पाच वर्षांत या केंद्रासाठी टप्प्याटप्प्याने पाच कोटी रुपये खर्च केले जातील.या केंद्रात प्रामुख्याने ज्यांना स्टार्टअप स्टंॅडअप योजनेत उद्योग सुरू करणाऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. हे केंद्र येत्या सप्टेंबर महिन्यात सुरू होत असून सरकारच्या वतीने ३० हजार रुपये पगार अथवा भत्ता या उद्योजकांना मिळणार आहे. 

सीएमआयच्या नव्या कार्यकारिणीने जाहीर केलेला कलमी कार्यक्रम पुढीलप्रमाणे.. 
- शंेद्रायेथील प्रलंबित इंटरनॅशनल कव्हेशन सेंटरचा पाठपुरावा 
- चिकलठाणाविमानतळाचा उडाण योजनेत समावेश करून विस्तारीकरण आणि आंतराष्ट्रीय विमान सेवा वाढवणे 
- जालना, मनमाड दुपदरी करून मुंबई दिल्ली कनेक्टिव्हिटी तसेच चेन्नई, बंगळुरू, अहमदाबादसाठी विशेष गाड्या आणि जालना-शेंद्रा, औरंगाबाद वाळूज, नगर ,सुपा, रांजणगाव,शिरपूर, चाकण हे मार्ग जोडण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार 
- रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी सर्व महानगरांशी औरंगाबाद जोडावे या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार 
- शहरासह ग्रामीण भागात जलयुक्त शिवार योजनांना पाठबळ, रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रचार प्रसारसाठी पुढाकार, धरणातील पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यावर विशेष काम करणार 
- इजऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत शासनाच्या सबसिडी वेळेत मिळत नाही त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार 
- औरंगाबादशहरात लॉ स्कूल, स्कूल ऑफ प्लॅनिंग (एसपीए), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही संस्था सुरू करण्याबाबत पाठपुरावा करणे. 
 
जीएसटीचा परिणाम नाही, ८० टक्के ऑर्डर सुरू 
उद्योगजगतावर जीएसटी कायद्याचा फारसा परिणाम झालेला नाही. पहिले काही दिवस ऑर्डर थांबल्या होत्या. कारण सिस्टिममध्ये मोठा बदल झाला आहे. आता मात्र ८० टक्के व्यवहार सुरळीत झाले असल्याचे सीएमआयएचे नवे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...