आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Months The Aurangabad City 393 People Affected Of AIDS

औरंगाबाद शहरात ५ महिन्यांत ३९३ जणांना एड्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजची युवा पिढी झपाट्याने एड्सग्रस्त होत आहे. २०१४ या चालू वर्षाच्या पाच महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ३९३ जणांना लागण झाली आहे. त्यात २५८ लोक हे औरंगाबाद शहरातील आहेत. या एकूण संख्येत लागण झालेल्यांमध्ये २१ गर्भवती महिलांचा समावेश आहे. दुसरीकडे गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यात १० हजारांपेक्षाही अधिक जणांना या रोगाची लागण झाली आहे. अशी परिस्थिती असतानाही जनजागृती करणाऱ्या राज्य एड्स नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राकडे पुरेसा निधी नाही हे विशेष.

एड्स हा गंभीर आजार असून शासनाने या रोगाची लागण होऊ नये म्हणून गाव, तालुका आणि जिल्‍हास्तरावर एड्स नियंत्रक संस्था नेमल्या. त्यांच्यावर जनजागृती करण्याची जबाबदारी सोपवली; पण या रोगाविषयी पािहजे त्या प्रमाणात जनजागृती होताना दिसूनन येत नाही. परिणामी शहरात याचे प्रमाण झपाट्याने वाटत आहे.

या संस्था करतात काम
एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने प्रत्येक जिल्‍ह्यात जिल्हास्तरावर सामाजिक संस्थांना जनजागृती करण्याचे काम सोपवले आहे. जिल्‍ह्यात वैजापूर, गंगापूर आणि कन्नड या तालुक्यात सेक्स वर्कर (वेशा व्यवसाय) यांच्यासाठी प्रेरणा सामाजिक संस्था ही संस्था काम करते. तसेच शहर व औरंगाबाद, सिल्लोड, पैठण, खुलताबाद या तालुक्यांसाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था काम करत आहे. तसेच ‘मेल हॅविंग सेक्स विथ मेल’ या घटकांसाठी वैजापूर, औरंगाबाद, पैठण या भागासाठी गौरव ट्रस्ट आणि इतर तालुक्यात अस्तित्व महिला बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहे. तसेच स्थलांतरित कामगारांमध्ये हा रोग पसरू नये म्हणून त्यांच्यासाठी आयएसआरडी संस्था शेंद्रासह शहरात काम पाहते तर वाळूज परिसरासाठी दिशा बहुउद्देशीय संस्था काम करते.
निधीची वानवा, जागृतीला खिळ...
एड्सबाबत काम करणाऱ्या जिल्‍हा एड्स नियंत्रण संस्था व अन्य विविध संस्थांना यंदाच्या २०१४-१५ या आिर्थक वर्षात निधीच मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. आिर्थक वर्ष सुरू होऊन सहा महिने उलटले तरीही हा पैसा न मिळाल्यामुळे या कामाला हवी तशी गती मिळत नाहीय.
फक्त ५ महिन्यांत...
चालू वर्षात गेल्या पाच महिन्यांत १५ हजार ८१४ पुरुष, तर १५ हजार १४४ महिला अशा एकूण ३१ हजार २६० जणांनी तपासणी केली. त्यातून ३९३ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात २२५ पुरुष आणि १६८ महिलांचा समावेश आहे. गरोदर महिलांच्या तपासणीत २५ हजार २२७ महिलांपैकी २१ महिलांना एड्सची लागण झाल्याचे िनष्पन्न झाले आहे.
एड्स होऊ नये म्हणून उपाय
एड्ससारख्या रोगाची लागण होऊ नये यासाठी संयम ठेवा, एका साथीदाराशी एकनिष्ठ राहा, कंडोमचा योग्य व नियमित वापर करा, गरोदर महिलेने एचआयव्हीची तपासणी जरूर करा, बाळाला एचआयव्ही संसर्गापासून वाचवू शकते. त्यासाठी एकाित्मक सल्ला व तपासणी केंद्राला भेट द्या, कंडोम वापरल्यास नको असलेली गर्भधारणा टाळता येते.
यावर्षी कार्यालयाला निधी प्राप्त झालेला नाही. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात एड्स रोगाची लागण झालेल्याची संख्या जास्त आहे. यावर रुग्णांची काळजी, औषधोपचार यावर भर िदला जात आहे.

-मंगेश गायकवाड, कार्यक्रम अधिकारी, जिल्‍हा एड्स नियंत्रक कार्यालय
जागृती करण्यासाठी राज्य एड्स नियंत्रण सोसायटी काम करीत आहे. मागच्या काही वर्षांपेक्षा संख्या कमी आहे. एआरटी सेंटर, उपजिल्हा रुग्णालयातून जनजागृती करीत आहोत.
-जी. एम. गायकवाड, जिल्‍हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद
ही आहेत एड्स होण्याची कारणे
हा विषाणू पेशींना दुर्बल बनवितो व त्यांचे प्रमाण कमी करतो तेव्हा आपल्या शरीराची आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती कमी होत जाते व शरीर कमकुवत बनते. अशा अवस्थेत अनेक आजार एकाच वेळी आपल्या शरीरात घर करतात. एचआयव्ही रोगाची लागण होण्यामागची कारणे अनेक आहेत. यात पहिले एचआयव्ही संसर्गित रक्त वापरल्याने, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीसोबत असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने, एचआयव्ही संसर्गित मातेकडून ितच्या होणाऱ्या बाळाला आणि एचआयव्ही संसर्गित सुई अथवा सिरिंजचा वापर केल्याने एड्सची लागण होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा तत्‍का