आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन 5 अग्निशमन केंद्रे होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सुमारे१३ लाख लोकसंख्येच्या शहरात केवळ दोनच अग्निशमन केंद्रे असल्याने अग्निशमन बंब पोहोचेपर्यंत नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होत होते. भविष्यात मात्र नागरिकांना नुकसानीच्या झळा कमी बसतील. याचे कारण म्हणजे शहरासाठी आणखी पाच नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी शासनाने कोटी ७८ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्यात मनपाचा हिस्सा कोटी ३१ लाख रुपये राहणार असून हा निधी देण्यासही प्रशासनाने संमती दिली आहे.
संपूर्ण शहरातील आगीच्या घटनांचा भार बन्सीलालनगर, सेव्हन हिल्स आणि चिकलठाणा या तीनच अग्निशमन केंद्रांवर होता. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाची तारांबळ होत होती. तीन दिवसांपूर्वीच शहागंज मध्ये वेळेवर बंब पोहोचू शकल्याने आगीत दुकानांचे नुकसान झाले. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन २०१२ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने शहरात पाच नवीन अग्निशमन केंद्रांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. या पाच केंद्रांना मंजुरी देऊन शासनाने गेल्या आठवड्यातच कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मनपाला दिला आहे. त्यात मनपाचा हिस्सा टाकून या नवीन केंद्रांच्या कामाला फेब्रुवारीअखेर प्रारंभ होणार आहे.

शहराला१३ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता : शहराचीलोकसंख्या १३ लाख आहे. ५० हजार ते एक लाख लोकसंख्येच्या भागाला एक अग्निशमन केंद्र या निकषानुसार शहराला १३ अग्निशमन केंद्रे आवश्यक आहेत. प्रत्यक्षात शहरात तीनच केंद्रे असून आणखी १० केंद्रांची गरज आहे. त्यापैकी नवीन पाच केंद्रांना मंजुरी मिळाली असून आणखी पाच केंद्रांचीही गरज आहे.

५५ कर्मचाऱ्यांची मागणी
अग्निशमनदलात फायरमन, ड्रायव्हर आणि हेल्परची भरती करावी लागणार आहे. त्यासाठी शासनाकडे नवीन ५५ कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.

याच महिन्यात बांधकामास प्रारंभ
शासनाकडून निधी आला असून प्रशासनानेही हिश्श्याची रक्कम देण्यास संमती दिली. त्यामुळे याच महिन्यात बांधकामास प्रारंभ होईल. त्याचबरोबर शासनाकडे ५५ कर्मचारी भरण्यासाठी मंजुरी मागितली आहे. शिवाजी झनझन, अग्निशमन विभागप्रमुख

या ठिकाणी होणार केंद्रे
शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या शहागंज भागात आगीची घटना घडल्यास तेथे चिकलठाणा, सेव्हन हिल्स आणि बन्सीलालनगर येथून गाड्या न्याव्या लागत होत्या. येथे गाडी पोहोचेपर्यंत वेळ होत असल्याने याच भागात नवीन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. तसेच सिडको-हडको परिसरासाठी टीव्ही सेंटर, हर्सूल, पैठण रोड आणि मिटमिटा भागात ही केंद्रे होणार आहेत. त्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

मनपाला द्यावा लागणार ६५ % हिस्सा
पाच अग्निशमन केंद्रे बांधण्यासाठी इतर साहित्यासाठी एकूण खर्चाच्या ३५ टक्के म्हणजे कोटी ७८ लाख रुपयांचा निधी शासनाने मनपाला दिला आहे, तर उर्वरित ६५ टक्के निधी म्हणजेच कोटी ३१ लाख रुपये देण्यास मनपा प्रशासनानेही संमती दिली आहे.