आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या समांतरसाठी 5 वर्षे; योजना रद्दच्या शिफारशीने भाजप, एमआयएम आनंदी, सेनेत सन्नाटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकांची लूटमार करणारी समांतर जलवाहिनी योजना रद्द करावी, अशा सबळ कारणांसह शिफारस करणारा प्रस्ताव मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेवल्यानंतर भाजप आणि एमआयएममध्ये आनंद, तर शिवसेनेत सन्नाटा पसरला आहे. समांतरविषयी बुधवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलावली असून त्यात महापौर, आयुक्तांशिवाय तिन्ही आमदार समांतरचे कट्टर पुरस्कर्ते खासदार चंद्रकांत खैरे यांनाही पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, समांतरचे काय करायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरच घ्या, असे भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांना वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याने त्यांनी २९ जून रोजी सायंकाळी वाजता बैठक आयोजित केली आहे. दरम्यान, समांतरला पर्यायी योजना पूर्ण होण्यास किमान पाच वर्षे लागतील, असे प्रशासनातर्फे सभेत मांडले जाणार आहे. समांतरबद्दल निर्णय घेण्यासाठी ३० जूनला विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेसोबत तब्बल ३१ पानी प्रस्ताव जोडण्यात आला अाहे. त्यात बकोरियांनी हा प्रकल्पच रद्द करण्याची शिफारस केली आहे. बकोरियांचा प्रस्ताव म्हणजे ठेकेदार औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसाठी शेवटची घंटा ठरण्याची चिन्हे असल्याने शहरात खास करून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात दुपारी वाजता मंत्रालयातील कदमांच्या दालनात होणाऱ्या बैठकीसाठी महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे इम्तियाज जलील, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ संबंधित अधिकाऱ्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याच काळात मुंबईत मातोश्रीवरून काय आदेश येतो याची वाट शिवसेना पाहत आहे. समांतरचे समर्थन राजकीय आत्महत्या ठरेल, पण विरोध केला तर पक्षाची विविध पातळ्यांवर अडचण होईल. शिवाय योजनेचे पातकही माथी लागेल, असे सेनेच्या पदाधिकारी, नगरसेवकांना वाटत आहे. त्यामुळे बुधवारी बहुतांशांनी रेकाॅर्डवर बोलण्यास नकार दिला. एवढे घमासान सुरू असताना गटनेते राजू वैद्य चक्क दुबईत सुटीचा आनंद घेत आहेत.
कदमांच्या बैठकीवरून भाजपत मतभेद पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला जायचे की नाही याबाबत भाजपचा रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता. समांतरविरोधात भूमिका ठरलेली असताना तेथे जाण्यात काय हशील, असा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे. पण दुसरीकडे पालकमंत्री या नात्याने ही बैठक बोलावण्यात आल्याने जाण्यास हरकत नाही असाही एक प्रवाह भाजपमध्ये आहे.
पुढे वाचा....
भाजपखुश, पण टेन्शनमध्ये
बकोरियांनी पत्रात मांडले फायद्या-तोट्याचे गणित
बातम्या आणखी आहेत...