औरंगाबाद : एकट्यादुकट्याच्या प्रयत्नाला मर्यादा येतात, पण अनेक घटक एकत्र आले आणि सकारात्मक विचार केला तर या मर्यादा रुंदावतात. यंत्रणा आणि नागरिक एकत्र आले तर काय चमत्कार घडू शकतो हे शहरातील जवळपास ५० वसाहतीतील स्वच्छतेचे चित्र पाहिले तर लक्षात येते.
कचऱ्याचे वर्गीकरण लोक स्वत:च करत आहेत. मनपाचे कर्मचारीही तितक्याच हिरीरीने पुढाकार घेऊन या कचऱ्यापासून १०० टन सोन्यासारखे खत तयार करून शेतकऱ्यांना मदत करत आहेत. हा बदल कसा झाला, त्यासाठी यंत्रणेने काय केले आणि त्याला नागरिकांनीही कसा प्रतिसाद दिला याचा हा लेखाजोखा...
स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत आपले शहर ५६ व्या क्रमांकावर आले आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टॉप टेनमध्ये येणे गरजेचे आहे. एकून हजार गुणांपैकी ७५ गुण हे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला देण्यात येणार आहेत. यासाठी शहर चकाचक असणे आवश्यक आहे. यासाठी मनपा आणि काही वसहतींमधील नागरिक पुढाकार घेत आहेत.
या प्रभागांचा समावेश
हडकोतील झाेन क्रमांक मधील एन-११ हडकोअंतर्गत प्रभाग क्रमांक यादवनगर, प्रभाग क्रमांक सुदर्शननगर, प्रभाग क्रमांक १० रोजाबाग, प्रभाग क्रमांक २८ स्वामी विवेकानंदनगर, प्रभाग क्रमांक २९ श्रीकृष्णनगर, प्रभाग क्रमांक ३० पवननगरअंतर्गत या एकूण ५० वसाहतींमध्ये लोकसहभागातून मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागास शून्य कचरा मोहीम यशस्वी झाल्याचे या परिसरातून दिसून आले. कचरा वाहन येईपर्यंत लोक वाट पाहतात. रविवारच्या सुटीच्या दिवशी वर्गीकरण केलेला कचरा घरातच ठेवतात. या वेळी त्या-त्या वॉर्डातील नगरसेवकांनी स्वच्छता निधीतून ओला सुका कचरा संकलन करण्यासाठी प्रत्येक घराला दोन डस्टबिन उपलब्ध करून दिल्याचे सर्वच महिलांनी सांगितले.
असे केले जाते वर्गीकरण
केवळ ओला आणि सुका नाही तर डायपर्स, बँडेजेस, भाज्यांचे देठ, फळांची अंड्यांची टरफले, हाडे, पालापाचोळा तसेच चपाती आणि भाकरी सारे काही लोक स्वत:च वेगवेगळे करून मनपाच्या गाडीत टाकतात. एवढेच नव्हे तर हाताला दुखापत होऊ नये म्हणून तुटलेल्या काचा, ब्लेड, ट्यूबनळी अन् खिळ्यांचेही योग्य वर्गीकरण केले जाते. घरातील प्रत्येक माणूस ही काळजी घेतो. अगदी घरातले चिमुरडे पोरही याबाबत दक्ष असते.
खतासाठी केले मोठमोठे खड्डे
मनपाचे कर्मचारीही हा कचरा घेऊन त्याचे कंपोस्ट खत करतात. यासाठी हडकोतील एन - ११ भाजी मंडई, एन - १२ सत्यविष्णू हॉस्पिटलसमोर एन - फरशी मैदानावर प्रत्येकी १० बाय १५ चे मोठमोठे खड्डे केले आहेत. येथे कमीत कमी सहा वॉर्डातून दैनंदिन १५ टन कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येत आहे. यातही संकलित केलेल्या कचऱ्याचे पुन्हा वर्गीकरण करून निवडक सुका कचरा भंगार विक्रेत्यांना देण्यात येत आहे. यामुळे मनपा कर्मचाऱ्यांनादेखील प्रत्येक रिक्षाच्या दिवसागणिक फेरीतून १५० ते २०० रुपये आर्थिक स्रोत तयार झाला आहे.
सेवा क्षेत्र : सॉफ्टवेअर,चित्रिकरण, छायाचित्रे, ब्युटी पार्लर, व्यायाम शाळा, उपहाग गृह, घड्याळ दुरुस्ती, सायकल दुरुस्ती, टायपिंग, ऑटो कॅड, रंग काम, ऑटोमोबाइल दुरुस्ती, ऑटोमोबाइल वॉशिंग सेंटर, गिरणी, रेडियम आर्ट, स्क्रीन प्रिंटिंग, पॅथोलॉजी लॅब, बोअरवेल टेस्टिंग, कुरअर, इलेक्ट्रोप्लेटिंग, एसी दुरुस्ती, वैद्यकिय सेवा, पाणी टाकी शुद्धीकरण, मोटार रिवायडिंग, तंबू पुरवणे, प्रकाश-ध्वनी योजना पुरणे, भांडी वा इतर उपयोगाच्या वस्तु बनवणे, जॉबवर्क.
१०० टन खत: मनपाचेकर्मचारीही हा कचरा घेऊन त्याचे कंपोस्ट खत करतात. बघता बघता आता १०० टन खत तयार होऊ लागले असून ६० टन खत पिसादेवी, पोखरी, हर्सूल, वरूड, चिकलठाणा, पळशी अन् अन्य भागातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
४० टन खत हर्सूल तलावाजवळील मनपाच्या जांभूळवनासह इतर उद्यानात विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे अनेक शेतकरी आणि मनपाची उद्याने फुलवण्यात याचा फायदा होत आहे. या प्रक्रियेमुळे नारेगावला जाणारा दैनंदिन १५ टन कचरा कमी झाला. दुसरीकडे यासाठी लागणारी वाहने आणि वाहतुकीसाठी लागणारा खर्च कमी झाला.
या ठिकाणी १०० टक्के कचरामुक्ती: वरीलसहाही वॉर्डांतील ८० कचराकुंडयांचे पॉइंट बंद करण्यात आले आहेत, तर १६ खुल्या जागा कचरामुक्त करण्यात आलेल्या आहेत. आता याठिकाणी रांगोळी, पक्षी पाणपोई जनावरांची पाणपोई तर कुठे वृक्षारोपण करून कचरा टाकण्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत.
द्वारकानगर, सुदर्शननगर, मयूरनगर, नवजीवन कॉलनी, नवनाथनगर, पाथ्रीकरनगर, रोजाबाग, सिद्धार्थनगर, भारतमातानगर, छत्रपतीनगर, एकता कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, स्वामी विवेकांनदनगर, एन -१२ डी सेक्टर, एन - श्रीकृष्णनगर, चंद्रनगर, कोमल, बाबासाहेब आंबेडकर, अगस्ती इत्यादी हाउसिंग सोसायट्यांसह किमान ५० वॉर्ड कचरामुक्त झाल्याचा मनपाने दावा केला आहे.