आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत हटवली ५० अतिक्रमणे, ‘दिव्य मराठी'ने प्रसिध्द केेलेल्या वृत्ताची तत्काळ दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडकोतीलअतिक्रमणासंदर्भात ‘दिव्य मराठी'ने प्रसिध्द केेलेल्या वृत्ताची तत्काळ दखल घेत वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्याच्या बाजूची सुमारे ५० अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी (दि. १६) पोलिस बंदोबस्तात हटवली. सावतानगर येथे रस्ता रुंदीकरणाच्या कामात ही अतिक्रमणे अडथळा ठरत होती. उशिरा का होईना, पण प्रशासन जागे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाटीलनगर ते पवननगर भागातील सर्व अतिक्रमणे या मोहिमेत काढण्यात आली. अनेक रहिवाशांनी पक्के बांधकाम केले होते. तर काहींनी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी थेट रस्त्यावरच जनिे लावले होते. त्यामुळे या भागातील रस्ता छोटा होऊन वाहतूक कोंडी होत होती. अतिक्रमण निर्मूलन विभागाने या सर्व अतिक्रमणांवर जेसीबी फिरवला. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. त्रिमूर्ती चौकातील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमणही हटविण्यात आले. विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता यू. एस. गांगुर्डे, डी. आर. हांडोरे, आर. बी. गावित यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली.
अशी झाली मोहीम

वाढीव बांधकामाचे अतिक्रमण िसडकाेमुळे; पण त्रास पालिकेला
सिडकोच्याघरांच्या वाढीव बांधकामास परवानगी देण्याचे काम सिडको प्रशासन करते. सिडकोच्या बेजबादारपणामुळे अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. विकासकामात सगळ्यात मोठा अडसर या अतिक्रमणाचा आहे. मात्र, हे अतिक्रमण काढण्याची वेळ आता महापालिकेवर आली आहे.