आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 500 Farmer Make Suside In Marathwad Due To Drought In Marathwada

धक्कादायक - मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पाचशेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मावळलेल्या २०१४ या वर्षात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत मिळून ५११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवसाची सरासरी बघितली तर दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत.
नवे वर्ष दाखल होण्यापूर्वीच दुष्काळाने मुक्काम ठोकला असल्याने शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये सर्वाधिक म्हणजे ९१ आत्महत्या झाल्याची नोंद शासनदरबारी अधिकृतपणे झाली आहे. यामागे शासनानेच धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने १ लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र, यासाठी त्याने बँक किंवा शासनमान्य वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले असणे बंधनकारक आहे.
खासगी सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास मदत मिळत नाही. त्यामुळेच ५११ पैकी फक्त २७४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची तोकडी का होईना मदत मिळू शकली आहे. अन्य १५५ शेतकरी मात्र मृत्यूनंतरही या मदतीस अपात्र ठरले आहेत. १०३ प्रकरणे अजूनही विचाराधीन आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये बीड जिल्हा सर्वात पुढे आहे, तर सर्वात कमी आत्महत्यांची नोंद जालना जिल्ह्यात झाली आहे.
शासनाने विचार करावा
^भाव पडल्यानंतर सरकार हात वर करते. मात्र, भाव चढल्यानंतर शेतमालाला भाव वाढवून देतो, असे कोणीही म्हणत नाही. कांदा निर्यातबंदी घालणे, साखर निर्यातबंदी घालून येथील शेतकऱ्यांना हवालदिल केले जाते. भाव वाढल्याने त्याच्या पदरी काही पडेल असे त्याला कधीच वाटत नाही.
मात्र, त्याच्या कर्जावर इतरांपेक्षा जास्त व्याज आकारले जाते. त्यामुळे आपले कोणीच नाही, ही भावना अन् कोणाचे आपल्याकडे ऋण आहे, ते आपण फेडू शकत नाही, याचा विचार स्वाभिमानी भावनेतून शेतकरी करतो अन् हा मार्ग पत्करतो. शासनाने पोशिंद्याचा विचार आधी केला तर कदाचित हे चित्र बदलू शकते. श्रीकांत उमरीकर, नेते, शेतकरी संघटना.