आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील 506 पैकी 400 बंद ‘बार’ उघडणार, नागपूर खंडपीठाच्या निर्देशांमुळे मार्ग मोकळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे एप्रिलपासून बंद झालेले जिल्ह्यातील महामार्गालगतच्या ५०६ पैकी महापालिका, नगरपालिका नगर पंचायत हद्दीतील किमान ४०० ते ४२५ बार दारू दुकाने नागपूर खंडपीठाच्या गुरुवारच्या निर्देशांमुळे पुन्हा खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागातच याबाबत संभ्रम होता. 
 
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाने औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील ५०६ मद्यालयांना एप्रिलपासून टाळे लागले होते. यात ३४३ बिअर बार, १७ वाइन शॉप, ६६ देशी दारूचे अड्डे, ७७ बिअर शॉपी अाणि ई-बारचा समावेश होता. नागपूर खंडपीठाच्या आदेशाबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ आहे. आदेशाची प्रत किंवा मुंबईहून याबाबत कोणतीच सूचना आल्याने नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत विभागात संभ्रम आहे. सूचना आल्याशिवाय काही करता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात सुमारे ६६० बिअर बार, वाइन शॉप, देशी दारूचे अड्डे, बिअर शॉपी आहेत. यापैकी महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील ५०६ मद्यालये बंद होती. यात जिल्ह्यात २४३, तर मनपा हद्दीत २६३ मद्यालयांचा समावेश आहे. 
 
१२ दुकाने स्थलांतर करून फसली 
कोर्टाच्याबंदीनंतर १२ दारू दुकानांनी स्थलांतर केले होते. नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे त्यांना जुन्या जागेत व्यवसाय करता येऊ शकतो. मात्र, यासाठी परत जुन्या जागेवर जायचे झाल्यास त्यांना आता दहापट शुल्क भरावे लागणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...