आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 523 Opposition Candidate Take Election Back In Aurangabad

सर्व पक्षांचे बडे बंडोबा मैदानातच! दिवसभरात ५२३ जणांनी घेतली माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना काही ठिकाणी यश आले; पण बहुतेक ठिकाणी अपयशच आल्याचे चित्र आज उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळाले. माघार घेण्यासाठी आमिषांपासून विनवण्यांपर्यंत सारे काही फंडे आजमावत ताकदवानांनी आपल्यासमोरील आव्हान कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज दिवसभरात तब्बल ५२३ जणांनी माघार घेतली.
आता मैदानात ९५२ उमेदवार राहिले आहेत. असे असले तरी शिवसेना भाजपचे तगडे बंडखोर आजही मैदानात ठाण मांडून आहेत. ११३ वॉर्डांच्या मनपासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. किमान पाच वॉर्ड बिनविरोध आणण्याचे टार्गेट शिवसेनेने ठेवले होते. त्यात ज्योतीनगर, वेदांतनगर, बन्सीलालनगर, समर्थनगर, क्रांती चौक, अजबनगर इटखेडा या वॉर्डांचा समावेश होता.
शिवसेनेने लावलेल्या फील्डिंगला फक्त ज्योतीनगरात यश आले. वेदांतनगरात बिनविरोधचा प्रयत्न जवळपास यशस्वी झाला होता, पण प्रतिस्पर्धी उमेदवाराने न्यायालयात धाव घेतल्याने तो अयशस्वी झाला. इटखेडा, समर्थनगर, बन्सीलालनगर, क्रांती चौक, अजबनगरात हे प्रयत्न कमी पडले. समर्थनगरात खुद्द खासदार चंद्रकांत खैरे आपल्या मुलाच्या सेफ सीटसाठी प्रयत्न करीत होते. त्यांनी भाजपचे बंडखोर संकेत प्रधान यांना कसेबसे बसवण्यात यश मिळवले. बन्सीलालनगरात मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यासाठी आमदार संजय शिरसाट स्थायीचे सभापती विजय वाघचौरे यांनी बिनविरोध होण्यासाठी खूप खटपट करून पाहिली, पण यश आले नाही.
इटखेड्यातही नंदकुमार घोडेले यांनी बिनविरोध होण्याचे खूप प्रयत्न करून पाहिले, पण त्यांना यश आले नाही. अजबनगरात माघारीसाठी उमेदवारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करून पाहण्यात आला, पण त्यात यश आले नाही. क्रांती चौक वाॅर्डातही हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
प्रमुखबंडखोरांची माघार नाही :शिवसेनेने कितीही प्रयत्न केले तरी बडे बंडोबा मैदानातच राहिले आहेत. गजानन बारवाल यांनी खासदार खैरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेकांच्या फोननंतरही माघार घेतली नाही.
विद्यमान नगरसेविका संगीता बरथुने यांचे पती भरत बरथुने यांनीही माघार घेतली नाही. परिणामी पदमपुऱ्यात शिवसेनेला घरच्यांचेच आव्हान राहणार आहे. सुशील खेडकर यांनी भाजपच्या उल्कानगरीत बंड पुकारले. त्यांनीही विनवण्यांना भाव दिला नाही. गुलमंडीवर सचिन खैरे यांच्यासाठी प्रयत्न करूनही शिवसेनेचे पप्पू व्यास किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी माघार घेतलेली नाही. किशोर नागरे बी फॉर्मच्या घोळामुळे अपमानित झाल्याने चांगलेच इरेला पेटले आहेत. मयूरनगरात त्यांच्या पत्नींनी माघार घेतलेली नाही.

केंद्र माघार रिंगणात

ताठेमंगल कार्यालय ६४ १०८
मौलाना आझाद संशोधन केंद्र ५८ १०६
आयटीआय किलेअर्क ४७ १४५
मध्यवर्ती जकात नाका ३९ ७८
गरवारे स्टेडियम ३५ ७९
कम्युनिटी सेंटर एन-२ ६० ७६
वॉर्ड कार्यालय, क्रांती चौक ४२ ८७
आयटीआय, देवगिरी कॉलेज २८ ७४
मनपा शाळा, जवाहर कॉलनी ६४ ९६
वॉ र्ड ब/इ कार्यालय, सिडको ८६ १०३
एकूण ५२३ ९५२
असे आहे माघारीचे चित्र, हे प्रमुख माघार घेणारे

सुनीलाक्षत्रिय (ज्योतीनगर), साधना सुरडकर (देवानगरी), बाळासाहेब थोरात (मयूर पार्क, सुरेवाडी), संगीता ताठे (श्रीकृष्णनगर), अनिल जैस्वाल (आविष्कार कॉलनी, गुलमोहर काॅलनी), रुक्मिणीताई शिंदे (जयभवानीनगर), अर्चना जायभाये (पुंडलिकनगर), निर्मला खेंडके (पुंडलिकनगर), संतोष खेंडके (न्यायनगर), जयश्री किवळेकर (पारिजातनगर), शमा आगा खान (भवानीनगर), शोभा निकाळजे (एकनाथनगर), सतीश कटकटे (गांधीनगर, खोकडपुरा), संकेत प्रधान (समर्थनगर), सुनीता सोनवणे (क्रांती चौक), ज्ञानदा कुलकर्णी (जवाहर कॉलनी)

१४ वॉर्डांसोबत १३६ उमेदवार वाढले

२०१० मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत ९९ वॉर्डांसाठी ८१६ उमेदवारांनी मैदानात उडी घेतली होती. यंदा वाॅर्डांची संख्या १४ ने वाढून ११३ झाली आहे. त्या प्रमाणात उमेदवारांची संख्याही वाढली आहे. यंदा गतवेळपेक्षा १३६ उमेदवार वाढले आहेत.

फोन,भेटीगाठी

शुक्रवारी दुपारी वाजेपर्यंत "मिशन बंडोबा-थंडोबा' सुरू होते. शिवसेना, भाजपचे कोअर कमिटीतील नेते, उमेदवार प्रयत्न करत होते. नाराजांना फोन करून समजावायचे, तरीही झाल्यास बैठका घेऊन त्यांची समजूत काढायची असा कार्यक्रम काल झाला. आज या नाराजांना आश्वासने तातडीची मदत करून माघार घ्यायला लावण्याचे प्रयत्नही झाले.

बंडोबांनी भाव खाल्ला

माघारीसाठी बंडखोरांना अपक्षांना चांगलाच भाव आला होता. बऱ्याच तडजोडींनंतर माघार घेणाऱ्यांनी निवडणूक केंद्रांचा रस्ता धरला. अनेक ठिकाणी उमेदवार लवाजम्यासह केंद्रांवर ठिय्या देऊन होते. माघार घेणाऱ्यांनीही आत्ता येतो, असे सांगत या उमेदवारांना ताटकळत ठेवले होते.