आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 5490 गावात ग्रामसभा संपन्‍न, विभागीय आयुक्तांनी मागितला मनरेगाचा अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात मनरेगाची कामे वाढावीत यासाठी विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी महिलादिनानिमित्‍त महिलांसाठी विशेष ग्रामसभा पार पडल्यानंतर गुरुवारी मराठवाड्यात सर्वत्र सर्वसाधारण ग्रामसभा पार पडल्या. या ग्रामसभांमध्‍ये गावकऱ्यांना मनरेगा योजनेविषयी माहिती दिली गेली. गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यत तब्बल ४९८० ग्रामसभा सुरु झाल्या होत्या.
 
मनरेगावर पहिल्यांदाच झाल्या एवढ्या ग्रामसभा
केवळ मनरेगा या विषयावर मराठवाड्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात या निमीत्ताने पहिल्यांदाच मनरेगांच्या योजनांची माहिती गावकऱ्यासमोर आली आहे.   त्यामुळे ग्रामीण भागात वैयक्तिक योजना आणि ग्रामविकासाच्या योजना देखील गावात पोहोचणार आहेत. अनेक ठिकाणी योजना गावकऱ्यासमोर आल्यामुळे ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
 
दिव्‍य मराठीच्‍या बातमीमुळे विभागीय आयुक्‍तांनी घेतली दखल 
संपूर्ण ग्रामीण व्‍यवस्‍थेचा कायापालट करण्‍याची क्षमता मनरेगा योजनेत आहे. मात्र त्‍याची संपूर्ण माहिती गावकऱ्यांपर्यंत पाहोचत नाही. त्‍यामुळे गावातील अनेक विकास प्रकल्‍प रखडले जातात व त्‍याचा फायदाही गावकऱ्यांना पाहोचत नाही. त्‍यामुळे गुरुवारी मराठवाड्यात ६६४३ गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे व सर्व गावकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली पाहिजे, अशी बातमी दिव्‍य मराठीने प्रकाशित केली होती. याची दखल घेत शासनाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वेळेवर सभा घेण्याचे तसेच ग्रामसंपर्क अधिकाऱ्यांनाही सभा सुरु झाल्याचे रिपोर्ट करण्याचे आदेश दिले होते.

८३ टक्के गावात सभा दुपारीच सुरु
मराठवाड्यातल्या ६६४३ ग्रामपंचायतीपैकी ५४९० गावात दुपारी बारा वाजता सभा सुरु झाली होती. तर काही ठिकाणी दुपारी दोन वाजता,चार वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता देखील ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे त्याची माहिती प्रशासनाला अजून प्राप्त झाली नाही.
 
३९ ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी होणार ग्रामसभा
औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यात काही तांत्रीक कारणामुळे सभा झाल्या नाहीत. यामध्ये औरंगबाद जिल्ह्यात सहा आणि जालना जिल्ह्यात ३३ गावात सभा झाल्या नाहीत. या ग्रामसभा शुक्रवारी होणार आहेत.
 
-  मराठवाड्यात २०१६-१७ मध्ये ४६७ कोटी रुपये फेब्रुवारीमध्ये मनरेगावर खर्च करण्यात आले होते. हा निधी १५०० कोटीपर्यंत नेण्याचे उदिष्ट विभागीय आयुक्तांनी ठेवले आहे.
बातम्या आणखी आहेत...