आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्रीयश’च्या ‘कॅम्पस’मध्ये ५५० जणांना मिळाली नोकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा परिसरातील श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालयात जून रोजी झालेल्या जॉब फेअर-२०१६ मध्ये ५५० बेरोजगारांना नोकरी मिळाली आहे. रोजगार मेळाव्यात मराठवाड्यातून हजार ६०० जणांनी भाग घेतला होता. त्यापैकी २४ कंपन्यांनी ५५० जणांना सेवेत सामावून घेतले आहे. त्याशिवाय पीईएस अभियांत्रिकी कॉलेजमध्येही चौघांची निवड झाली आहे.
यंदा विक्रमी विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात श्रीयशचे जॉब फेअर-२०१६ यशस्वी झाले आहे. व्हिडिओकॉन कंपनीमध्ये १४९ जणांना नोकरी मिळाली आहे. व्हेरॉक उद्योग समूह-८४, झेड एफ स्टिअरिंग लिमिटेड-२४, बडवे इंजिनिअरिंग- ४५, देवगिरी फोर्जिंग-३०, लक्ष्मी अग्नी उद्योग समूह- १३, वर्षा फोर्जिंग-७, यशश्री उद्योग समूह-२३, जोतिबा टेक्नॉलॉजी-६, धूत ट्रान्समिशन-५५, ग्यामा इंजिनिअरिंग-२१, नॅन्को एक्झिम-२४, एपीएलएस वेब डेव्हलपमेंट- २, बॅक ब्रीज सॉफ्टवेअर-६, इपिकॉन कन्सल्टंट-९, क्युबॅटिक इंजिनिअर्स-४, मुकेश शर्मा अँड असोसिएट्स-३, विझनरी टेक्नॉलॉजी-३, शिल्पिंग मशीन्स-५ आदी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष बस्वराज मंगरूळे, संचालक डॉ. उत्तम काळवणे, सीमा शेंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रा. दीपक पवार, प्रा. प्रताप मोहिते, प्रा. योगेश चव्हाण, प्रा. शफिक खान, प्रा. आर. आर. पाटील, प्रा. अमितकुमार, प्रा. प्रशांत महाकाळ, प्रसाद पुजारी, अविनाश चव्हाण आदींनी रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान पीईएस अभियात्रिकी महाविद्यालयात देवगिरी, श्रीयश, हायटेक, आयसीईई, जेएनईसी अभियांत्रिकी आणि शिरपूर येथील आयसीपीआयटी येथील ११० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. कंपनीने विद्यार्थ्यांची निवड केली असून त्यापैकी जण पीईएस अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत. संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान विभागाचे आदित्य वेणुगोपाल, प्रियंका ढगे, मेकॅनिकलचे शेरीन चातोथ आणि स्थापत्य विभागाचे लामसूक यांचा निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. डॉ. वाडेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. परिसर मुलाखतीसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. फैज सिद्दिकी, प्रा. वाय. एस. साबळे, प्रा. भरत झा, प्रा. विजोय पेडोनी आणि विनोद भडांगे आदींनी परिश्रम घेतले.

दोन लाखांवर पॅकेज
नवीमुंबई येथील एजीएस ट्रानसॅक्ट टेक्नॉलॉजी या कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (७ जून) चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. चौघांनाही दोन लाखांपेक्षा अधिकचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
उद्योजकता विकास कार्यक्रम २४ जूनपासून
औरंगाबाद - केंद्रीयतंत्रविज्ञान विभागातर्फे सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी विशेष उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकची उद्योगवर्धिनी शिक्षण संस्था, लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठान आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जूनपासून औरंगाबादेत हा कार्यक्रम सुरू होणार असल्याचे उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक आणि लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानचे मिलिंद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
२२ वर्षांत संस्थेने ३९ हजारांहून अधिक तरुणांना प्रशिक्षित केले असून ८१ पेक्षा अधिक जणांना रोजगार मिळाल्याचे चांडक यांनी सांगितले. ४५ दिवस दररोज तीन तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष उद्योजकता विकास कार्यक्रमातून ३० जणांची निवड केली जाणार असून केंद्राच्या ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...