आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षभरात ५५२४ संघ शाखा सुरू, संघाचे प्रांत कार्यवाहक हरीश कुलकर्णी यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोदी सरकार येऊन वर्ष झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्षभरात हजार ५२४ शाखा वाढल्या अाहेत, असे प्रांत कार्यवाहक हरीश कुलकर्णी यांनी गुरुवारी संघ कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, पाच वर्षांपासून शाखांत वाढ होत आहे. शाखा, साप्ताहिक मिलन, संघमंडळी या माध्यमातून दरमहा ते १० हजार स्वयंसेवकांची भर पडत आहे. यात ग्रामीण भागासह उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण जास्त आहे. या वेळी राजस्थानात झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेबद्दलही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास देशभरातील ४० संघटनांचे १०५८ प्रतिनिधी उपस्थित होते. रा. स्व. संघाच्या प्रेरणेतून देशात एकूण लाख ५२ हजार ३८८ सेवाकार्ये सुरू असून शिक्षण क्षेत्रात ८१२७८, आरोग्य क्षेत्रात २२७४१, सामाजिक संस्कार क्षेत्रात २८३८८ रोजगाराच्या क्षेत्रात २१९८१ सेवाकार्ये चालू आहेत.
विविध संघटनांनी वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहितीही या वेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेस देवगिरी प्रांत कार्यवाहक हरीश कुलकर्णी, देवगिरी प्रांत प्रचारक रामानंद काळे, प्रांत प्रचारप्रमुख वामनराव देशपांडे आणि शहर प्रचारप्रमुख राजेश लेहेकर यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...