आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात म्हाडाची 5 हजार ६६० नवीन घरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आैरंगाबाद विभागात म्हाडा हजार ६६० घरे बांधणार आहे. सप्टेंबर महिन्यात केंद्र राज्य शासनाने यास मंजुरी दिली आहे. आैरंगाबाद परिसरातील चार शहरांसह लातूर आणि जालना शहरांचा यात समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे अत्यल्प उत्पन्न गटासाठी सर्वाधिक ३७५६ घरांची निर्मिती केली जाणार आहे. या योजनेच्या लाभार्थींना केंद्र राज्य शासनाचे अनुदान मिळणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) केंद्र आणि राज्य शासनाकडून सहा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. केंद्राने पहिल्या टप्प्यात या योजनेअंतर्गत राज्यातील ५१ शहरांचा समावेश केला अाहे. यातील नऊ शहरे मराठवाड्यातील आहेत. एक उदगीर तालुक्याचाही समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात केंद्राने राज्यातील ९१ शहरांमधील गृहप्रकल्पांना मंजुरी दिली असून, यात आैरंगाबाद विभागातील आठ शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत आैरंगाबाद विभागातील दोन्ही टप्प्यातील शहरांची संख्या सतरा झाली आहे. या योजनेनुसार होणाऱ्या घरांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३७५६ घरांचा कोटा ठेवण्यात आला आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या घरासाठी घरासाठी अंदाजे लाख ५० हजार ते लाख ९० हजार रुपये इतकी रक्कम आकारण्यात येईल. लाभार्थीस केंद्र शासनाकडून लाख ५० हजार तर राज्याकडून लाखांचे अनुदान मिळेल. केंद्र राज्याचे अडीच लाख रुपयांचे अनुदान या रकमेतून कमी होईल. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकास सहा ते सात लाख रुपयांमध्ये घर मिळेल.

मान्यतेचे प्रस्ताव तत्काळ सादर होणार
^आैरंगाबाद विभागात घरांसाठी मंजूर प्रकल्पांच्या जागेची मोजणी पूर्ण झाली आहे. जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जागांचे प्रशासकीय तांत्रिक प्रस्ताव तत्काळ सादर केले जाणार आहेत. जाहिरातीद्वारे घरांसाठी अर्ज मागविण्यात येतील. -अनिल रामोड, सीईआे, म्हाडा, आैरंगाबाद .
बातम्या आणखी आहेत...