आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दप्तराचे ओझे होणार कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येत्या शैक्षणिक वर्षापासून पाचव्या वर्गाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. यात तीन विषयांच्या पुस्तकांना एकत्र करून एकच पुस्तक तयार केले आहे. पूर्वी आठ विषयांची आठ पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत होते. नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल.

यासंदर्भात मागील दोन वर्षांपासून पालक, शिक्षक समस्या मांडत होते. त्यानुसार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी नवीन अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली. यात सगळ्याच अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पूर्वी सहा महिन्याला अथवा वर्षाला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक इतर मूल्यमापन होत होते. नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचे नियमित मूल्यमापन होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास करून त्या सोडवण्याचा विचार होईल. शिक्षकांनाविशेष प्रशिक्षण : सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. २७ एप्रिलपासून शांतीनिकेतन शासकीय शाळा, अध्यापक महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत होते. रविवारी याचा समारोप झाला.

प्रावीण्य मिळवण्यासाठी मदत : एखादाविद्यार्थी चोरी करण्यासारखा गैरप्रकार करत असल्याचे मूल्यांकनातून लक्षात आल्यास शिक्षक त्याला सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतील. तसेच विद्यार्थ्याची आवड लक्षात घेऊन त्यांना खेळाडू, संगणक अथवा एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी शिक्षण देतील.

पाया पक्का होईल
अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होईल. ही पद्धत ज्ञान रचनावादी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभव आणि पूर्व ज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण देता, घेता येईल. विजयसाळकर, मुख्याध्यापक, डायगव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.

काय झाला बदल ?
- विज्ञान,भूगोल, नागरिकशास्त्र विषयाचा एकाच पुस्तकात समावेश
- इतिहासाला परिसर अभ्यास दोन असे नाव देण्यात आले.