आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीतील उपचार यंत्रांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ११ जिल्ह्यांतील रुग्णांचा भार असलेल्या घाटी रुग्णालयातील डायलिसिस, एमआरआय आणि सिटी स्कॅन उपचार यंत्रे अच्छे दिनच्या प्रतीक्षेत आहेत. सोमवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या डीपीसीच्या बैठकीत याविषयी ठोस निर्णय झाल्यास हजारो गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे. दोन जूनला मुंबईत झालेल्या बैठकीत कदम यांनी यंत्रसामग्रीसाठी ६ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यावर अंमलबजावणीसाठी कोणते ठोस निर्णय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरमहा सुमारे ३०० रुग्णांना डायलिसिसची आवश्यकता भासते. घाटीच्या औषधशास्त्र विभागामध्ये यंत्रे आहेत. त्यापैकी एक पूर्णपणे निकामी आहे. १८०० ते २२०० रुपयांचा डायलिसिसचा खर्च गरीब रुग्णांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे हे यंत्र उपलब्ध करून देणे सर्वाधिक गरजेचे आहे.
घोषणा हवेतच : कदमयांनी फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या बैठकीत प्रशासकीय बाजू जाणून घेता एमआरआयचे शुल्क १८०० वरून ७०० रुपये करा असे आदेश दिले. मग घाटी प्रशासनाने वैद्यकीय संचालनालयाला शुल्क कमी करण्यासंबंधीचा पत्र व्यवहार केला. मात्र, राज्यातील एकाच महाविद्यालयाला अशी सवलत देता येत नाही, असे सांगत संचालनालयाने मंत्रिमंडळाच्या कोर्टात चेंडू टोलवला. परिणामी एमआरआय शुल्कात कपात झालेली नाही.
एमआरआय, सिटी स्कॅन खासगीत : रुग्णांचा ताण प्रचंड असल्याने सिटी स्कॅन यंत्राचा वापर भरपूर होतो. गेल्या १५ दिवसांपासून एमआरआय आणि सिटी स्कॅन यंत्रे दुरुस्तीसाठीची सुमारे सहा लाखांची बिले निकामी झाली आहेत. त्यामुळे रुग्णांना खासगी चिकित्सा केंद्रात चाचण्या करून घ्याव्या लागत आहेत. विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे यांनी एमआरआय ते दिवसांत सुरू होईल, असा दावा केला आहे.
सिटी स्कॅनची ट्यूब निकामी, खर्च ८० लाखांपर्यंत
घाटीत एक स्लाइडचे, तर दुसरे ६४ स्लाइडचे सिटी स्कॅनचे यंत्र आहे. ६४ स्लाइडच्या यंत्रावर अचूक निदान होते. मात्र, त्यामध्ये असलेली एक ट्यूब (किंमत सुमारे ८० लाख) उडाल्याने यंत्र बंद आहे. वैद्यकीय संचालनालयाच्या परवानगीशिवाय ही ट्यूब येणार नाही. तोपर्यंत रुग्णांना स्लाइडच्या यंत्रावर तपासण्या कराव्या लागतील. यामुळे अचूक निदान आणि परिणामी उपचारांचा खोळंबा होणार आहे. यासाठी विशेष बाब म्हणून अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी ट्यूब खरेदीची परवानगी मागणारा पत्रव्यवहार केला आहे. लवकरच समस्या सुटेल, अशी त्यांनाही आशा आहे.
बातम्या आणखी आहेत...