आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी पथक दोन दिवसांत ६ जिल्ह्यांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक दोन दिवसांत सहा जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी पथकासमोर परिस्थितीचा आढावा विशद केला. त्यांनी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जलयुक्त शिवार योजनेला केंद्राने मदत करावी, अशी मागणी केली. केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंग आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे कार्यकारी संचालक ए. के. सिंग असे दोन जणांचे पथक सोमवारी संध्याकाळी शहरात दाखल झाले.
मराठवाड्यातल्या ११ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणीच झाली नाही. दुबार पेरणीचे संकटही ओढवल्याचे दांगट यांनी पथकाला सांगितले. मराठवाड्याचे पर्जन्यमान, जलसाठे,उर्वरित पान १०
झालेली खरिपाची पेरणी याबाबतची माहिती पथकाला देण्यात आली. पाच वर्षांपासून मराठवाड्यात नेमकी काय स्थिती आहे याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.विकेंद्रित पाणीसाठे तयार करण्यासाठी जलयुक्त शिवार हाच पर्याय आहे. त्यामुळे कायमस्वरूपी दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त शिवार योजनेला केंद्राने निधी द्यावा, अशी अपेक्षा या बैठकीत दांगट यांनी व्यक्त केली.
असा असेल दौरा
पथक दोन दिवसांत नांदेड आणि हिंगोली वगळता मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पथक पैठण तालुक्यातील ढोरकीन, ७४ जळगाव, पाचोड यासह वाटेत लागणाऱ्या गावांना भेटी देणार आहे. त्यानंतर जालना, वडीगोद्री, गेवराई तालुक्यातल्या गावांची पाहणी करणार आहे. गेवराईनंतर बीड तालुक्यातील मांजरसुंबा, उस्मानाबाद, वाशी, कळंब, ढोकी, मुरूड या गावांची पाहणी करणार आहे. बुधवारी लातूर, अंबाजोगाई तसेच परळी, गंगाखेड, परभणी, जिंतूर, सेलू, मंठा, जालना यांना भेट देत पथक औरंगाबादला परत येणार आहे.

उद्घाटनासाठी आलो नाही....
सोमवारी पथक विभागीय आयुक्तालयात आल्यानंतर कृत्रिम पावसासाठी बसवण्यात आलेल्या रडारची पथकाने पाहणी केली. तांत्रिक बाजूची माहिती जाणून घेतली. या वेळी अधिकाऱ्यांच्या वतीने यंत्रणा कार्यन्वित झाली असून तिचे उद््घाटन करा, अशी विनंती करण्यात आली. मात्र, राघवेंद्र सिंग यांनी आम्ही उद्घाटनासाठी आलो नसून दुष्काळ पाहण्यासाठी आलो असल्याचे आवर्जून सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी निधी पांडे, कन्सल्टंट रामवीर शर्मा यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.