आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६ महिने भाजप शहराध्यक्ष बदलाची 'घडामोड' नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत काही बदल झाले असले तरी शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांच्याकडेच ही धुरा पुढील सहा महिने राहणार आहे. सहा महिन्यांसाठी दुस-या कोणाला शहराध्यक्ष करण्यापेक्षा डिसेंबरमध्ये रीतसर प्रक्रिया करूनच शहराध्यक्ष करावा, यावर पक्षनेत्यांचे एकमत झाल्याचे समजते.

प्रदेश पातळीवर काही बदल झाल्यानंतर एक व्यक्ती एक पद या न्यायाने घडामोडे यांच्याकडील जबाबदारी दुसरी कोणावर सोपवली जाणार असल्याची चर्चा पक्षात सुरू झाली होती. विशेष म्हणजे घडामोडे यांनीही पदावरून दूर जाण्याची तयारी चालवली होती. कारण शहराध्यक्षपदी कायम राहिले तर पालिकेतील अन्य पदे घेता येणार नाही, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनीही लवकर कोणाला तरी नेमा, असा घोषा वरिष्ठांकडे लावला होता. मात्र तीन वर्षांसाठी शहराध्यक्ष नेमण्याचे ठरल्याने तूर्तास घडामोडेच या पदावर राहणार आहेत. स्वत: घडामोडे यांनीही यास दुजोरा दिला.
बातम्या आणखी आहेत...