आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात पाऊस थांबला; जायकवाडी धरणातील आवक 6 हजार क्युसेकवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसाने शनिवारपासून आवक सुरू झाल्याने या तीन दिवसांत जायकवाडीच्या पाणीसाठ्यात साडेचार टक्क्यांनी वाढ झाली आहे.  सध्या जायकवाडीच्या वरील भागात पाऊस थांबल्याने आवक ६ हजार ३३ क्युसेकने येत आहे. या आवकमुळे आज जायकवाडीचा पाणीसाठा २१.५० टक्के झाला असल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. विशेष म्हणजे ही आवक सुरू झाल्याने सोमवारी मराठवाड्यातील सिंचनाला पाणी सोडण्याचा निर्णय होणार होता. मात्र तो लांबल्याने पावसाने दांडी मारलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर अद्याप पीक वाचविण्याचा गंभीर प्रश्न उभा आहे.  

दोन दिवसांपूर्वी जी आवक गंगापूर, दारणा, मधमेश्वरमधून सुरू होती ती आता अत्यंत कमी केल्याने जायकवाडी प्रत्यक्षात सध्या ६०३३ क्युसेकने पाणी येत आहे. सध्या कडवातून एक हजार ३४५ क्युसेक, नांदूर-मधमेश्वरतून ११ हजार १५२ क्युसेक, दारणा ५५० क्युसेक, गंगापूरमधून ५५० ची आवक होत आहे. यावरील भागात आणखी पाऊस झाला तरच आवक सुरू राहील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.  

पाणी वाटपाचा तिढा निर्माण होणार
जायकवाडी धरणावरील भागातील सर्व धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असून पावसाळ्याच्या कालावधीत तो पाणीसाठा साठवता येत नसताना वरील धरणात पाणी साठवले जात असल्याने समन्वय पाणीवाटपाचा प्रश्न येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...