आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात 24 दिवसांत 625 डेंग्यूसदृश रुग्ण; 181 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- थंडीचा कडाका वाढूनही शहरात डेंग्यू कमी हाेण्याची काेणतीही चिन्हे नसून नोव्हेंबर महिन्यात गेल्या २४ दिवसांतच डेंग्यूसदृश आजाराचे तब्बल ६४५ रुग्ण आढळले अाहेत. धक्कादायक म्हणजे, त्यातील १८१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, उर्वरित रुग्णांचे रक्तनमुने जिल्हा शासकीय प्रयाेगशाळेकडून प्राप्त झालेले नाही. 


प्रारंभीस डेंग्यूला जबाबदार नाशिककरच असून त्यांच्या अस्वच्छतेमुळे डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचा कांगावा सत्ताधारी भाजपने केला हाेता. त्यानंतर महापाैरांनी बैठक घेत कारवाईचे अादेश दिले. मात्र, अद्याप डेंग्यू नियंत्रणात अालेला नाही. दरम्यान, ऑगस्टमध्ये ९७, तर सप्टेंबरमध्ये १०५ रुग्ण तर अाॅक्टाेबरमध्ये सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

बातम्या आणखी आहेत...