आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील धरणांत 63 टक्के पाणीसाठा, परतीच्या पावसाचा मराठवाड्याला दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात पावसाळा संपत आल्यानंतर १४ ऑक्टोबर अखेर ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये मोठ्या धरणांत सर्वाधिक ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी धरणात १३ टक्के ऊर्ध्व पैनगंगा १४ आणि मानार प्रकल्पात २२ टक्केच पाणीसाठा आहे. 
 
मराठवाड्यात गेल्या महिन्याभरापासून झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या ८६४ प्रकल्पात ५०२६ दलघमी इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ६२.७० टक्के इतके आहे. 
 
आठवडाभरात ३५ दलघमीने वाढला पाणीसाठा : मराठवाड्यात ४८९१ दलघमी इतका पाणीसाठा होता. यामध्ये वाढ होत हा पाणीसाठा ५०२६ दलघमी इतका झाला आहे. यामध्ये गेल्या आठवडाभरात ३५ दलघमीची वाढ झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा : औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा आहे. १६ मध्यम प्रकल्पात २०५ प्रकल्पीय क्षमता असताना केवळ २९ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये लहुकी, गिरजा, वाकोद,अंजनापळशी, शिवना टाकळी आणि टेंभापुरी धऱणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर ९० लघु प्रकल्पात १८४ क्षमता असताना ४९ दलघमी पाणीसाठा असून हे प्रमाण २६ टक्के इतके आहे. 
 
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पात ५९८ दलमघी पाणीसाठा असून हे प्रमाण ६३ टक्के इतके आहे. तर ७४३ लघु प्रकल्पात ८२७ दलघमी पाणीसाठा असून हे प्रमाण ५० टक्के इतके आहे. तर गोदावरी वरील ११ मोठ्या प्रकल्पांत १८४ दलघमी पाणीसाठा असून हे प्रमाण ८० टक्के इतके झाले आहे. 
 
मराठवाड्यातील पाच मोठे प्रकल्प भरले 
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पामध्ये जायकवाडी, मांजरा, सिनाकोळेगाव, विष्णुपुरी, निम्न तेरणा हे प्रकल्प भरले आहेत. तर माजलगाव धरणात २७७ दलघमी पाणीसाठा झाला असून हे धरण ८९ टक्के भरले आहेत. दुधना धरणात १८८ दलघमी पाणीसाठा असून ७८ टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्वर धरणात ५६ टक्के पाणीसाठा आहे. 
बातम्या आणखी आहेत...