आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात एटीएमची स्क्रीन फोडली, औरंगाबादेत 630 एटीएम कोरडे; बँकांतही गर्दी वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ पुणे- शहरातील एटीएमवरील गर्दी पाहून नोटाबंदीच्या काळातील कटू आठवणींना उजाळा मिळू लागला आहे. शहरातील ७०० पैकी ६३० एटीएममध्ये ठणठणाट झाला आहे. ज्या एटीएममध्ये पैसे आहेत तेथे नोटाबंदीच्या काळाप्रमाणे नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. बँकांमध्ये रक्कम उपलब्ध असल्याने तेथे रांगा लागत आहेत. लाखो लोकांची अशी फरपट सुरू असताना बँकांचे अधिकारी आरबीआयकडे बोट दाखवत आहेत.

दुसरीकडे, पुण्यात एटीएममधून पैसे न आल्याने अज्ञात व्यक्तीने मशीनची स्क्रीन फोडल्याची माहिती मिळाली आहे.

तीन आठवड्यांपासून नोटाच आल्याने एटीएम रिकामे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या परिस्थितीत कधी सुधारणा होणार, हेही ते सांगण्यास तयार नाहीत.
 
औरंगाबाद शहराला दररोज सुमारे २८० कोटी रुपये लागतात. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील एटीएम रिकामे आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस लोकांमधील संताप वाढत चालला आहे. एप्रिलला रविवार, एप्रिलला रामनवमी आणि एप्रिल आणि ०९ एप्रिलला बँकांना सुटी असल्यामुळे त्याचा परिणामही एटीएमवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एस.बी.आय.ने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ३०० कोटी रुपयांची मागणी आर.बी.आय.कडे केली होती, असे सांगण्यात आले.
 
नोटाबंदीच्या काळातला त्रास पुन्हा सुरू : किमान दहा ते वीस एटीएम फिरल्यानंतरही त्यांना पैसे मिळतीलच याची हमी नाही. टीव्ही सेंटर परिसरातील शेख शाकेर यांनी सांगितले की त्यांनी टीव्ही सेंटरपासून ते कॅनॉट परिसरात सर्व एटीएम धुंडाळले. मात्र कुठेही पैसे मिळाले नाहीत. नोटाबंदीच्या काळाप्रमाणेच नागरिकांचे पैशासाठी हाल सुरू झाले आहेत. नोटाबंदीच्या काळात देशाचे हित साधायचे होते. आता कोणाचे हित साधणार आहात, असा सवालही लोकांनी मोदींना उद्देशून केला.
 
ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज युनियनचे सहसचिव देवीदास तुळजापूरकर यांच्या माहितीनुसार शहरातील ७०० पैकी ६३० एटीएम कोरडे आहेत. एस.बी.आय.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी १५ कोटी रुपये एटीएममध्ये टाकण्यासाठी एजन्सीला दिले. मात्र, ही रक्कम काही तासांतच संपली.

पीओएसचाही तुटवडा : नोटाबंदीनंतरच्यादोन महिन्यांत शहरातील सुमारे २० हजार व्यापाऱ्यांपैकी साडेतीन हजार जणांकडे पीओएस आले. त्यानंतर पीओएस आले नाहीत. या मशीनचा तुटवडा असल्याने व्यापारी आणि लोकही अडचणीत आले आहेत.
 
एका बँकेच्या सीईओंनी नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की...
- नोटाबंदीच्या काळात सुरू असलेली हवाई मार्गाने नोटा पुरवठ्याची योजना थांबवण्यात आली.
- एटीएम,बँकांतून पैसे काढण्याचे निर्बंध ३१ मार्चनंतर उठवण्यात आल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढले.
- दोन हजाराची नोट बंद होणार असल्याच्या अफवेने लोकांनी ५००, १०० च्या नोटा काढून घरात ठेवल्या.
- देशात १९ लाख कोटी रुपयांची गरज आहे. सध्या दोन हजाराच्या लाख कोटींच्या, ५०० रुपयांच्या लाख कोटींच्या तर १०० रुपयांच्या साडेतीन लाख कोटींच्या म्हणजे एकूण - साडेतेरा लाख कोटींच्या नोटा बाजारात आहेत. त्यामुळे साडेपाच लाख कोटींचा तुटवडा आहेच.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, एटीएममध्ये टाकण्याएवढी रक्कम बँकांकडे नाही...
 
 
बातम्या आणखी आहेत...