आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीत सोडले ६५ लाख मेट्रिक टन रसायन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- खामनदीत २०११ पासून विषारी रसायन सोडण्यात येत होते. आतापर्यंत ६५ लाख मेट्रिक टन रसायन खाम नदीत टाकल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून त्यासाठी स्टरलाइट कंपनीचा व्यवस्थापक अमित रत्नपारखी याने ठेकेदारांना ११ कोटी रुपयांची बिले अदा केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रत्नपारखीला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला न्यायालयासमेार हजर केले असता १५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
स्टरलाइट कंपनीतील घातक रसायन खाम नदीत सोडल्यामुळे मनसे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, माजी नगरसेवक आगा खान, तुषार पाखरे, अस्लम शेख, चंदन महेंद्रसिंग यांना २८ फेब्रुवारी 2015 रोजी पहाटे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पकडले होते. सोमवारी स्टरलाइट कंपनीतील प्लँट हेड अनिल भदोरिया अमित रत्नपारखी यांची चौकशी केली. कंपनीतून बाहेर पडलेल्या टँकरच्या येण्या-जाण्याची वेळ तपासण्यात आली. अवघ्या अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर टँकरने कंपनीतून ये-जा केल्याचे समोर आले. हा प्रकार कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला गेला. डंपिंग चार्जेस आणि ट्रान्सपोर्टचा खर्च वाचवण्यासाठी रत्नपारखीसह टोळीने खामनदीत रसायन टाकण्याची शक्कल लढवली. अस्तित्वात नसलेल्या ठाण्यातील बालाजी केमिकल्स या कंपनीला ठेका दिल्याचे समोर आले. रत्नपारखीला पकडल्यानंतर आणखी सात जणांचा शोध सुरू आहे.
एका टँकरमागे पाच हजारांची कमाई
रत्नपारखीकंपनीचे विश्वासू अधिकारी होते. त्यांना कंपनीने १२ लाखांचे पॅकेज दिले होते. त्यांचे शिक्षण एमबीए झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून खाम नदीत विषारी रसायने टाकणे सुरू होते. एका टँकरमागे त्यांना हजार रुपये मिळत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...