आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

69 लाखांच्या चोरीने औरंगाबादेतील पोलिसही चक्रावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कारच्या सीटखाली असलेल्या पैशांच्या दोन्ही बॅगा चोरताना पाहिल्याचा एकही प्रत्यक्षद पुरावा अद्याप तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तसेच सीसीटीव्हीमध्ये काहीही स्पष्ट होत नसल्याने पोलिसही चक्रावले आहेत.
पोलिसांनी गुरुवारी स्कोडाच्या अधिकार्‍यांना गाडीची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. त्यात घटनेच्या पाच ते सहा तास अगोदर गाडीची काच फोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून धूत यांच्या गाडीत ‘बल्गर’ अर्लाम असल्याचे स्कोडाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. गाडीला स्पर्श जरी झाला तरी परिसरात मोठय़ाने आवाज होतो, असेही त्यांनी माहिती दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. गुरुवारी सात ते आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत. गारखेडा परिसरातील लक्ष्मीकांत धूत यांच्या स्कोडा फाबिया कारची काच फोडून बुधवारी 69 लाख 10 हजार लांबवण्यात आले. धूत आणि बुलडाणा येथील महंमद सज्जाद शेख अब्दुल खलील यांच्यात बीड बायपास रोडवरील प्लॉटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार चार महिन्यांपूर्वी झाला होता. अब्दुल शेख नईम यांच्या मध्यस्थीने धूत यांनी हा व्यवहार करत महंमद सज्जाद यांना इसार पावती करताना 26 लाख रुपये दिले होते. 24 नोव्हेंबर रोजी महंमद सज्जाद आणि धूत यांच्यातील इसार पावतीची तारीख संपुष्टात आली होती.