आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’ यंदा नाट्यरसिकांच्या भेटीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे 7, 8 डिसेंबरला दोन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. ‘मानापमान’ आणि ‘संशयकल्लोळ’ या दोन्ही नाटकांचे प्रयोग अनुक्रमे सात आणि आठ डिसेंबरला संत तुकाराम नाट्यगृहात रात्री 9 वाजता होतील, अशी माहिती चित्पावन ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष विकास गोंधळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
गोंधळेकर म्हणाले, गेल्या वर्षी ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संगीत सौभद्र’ या दोन नाटकांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा नाटकांच्या तिकीट विक्रीतून येणार्‍या रकमेपैकी काही भाग ‘साकार’ संस्थेला देण्यात येईल. ‘मानापमान’ आणि ‘संशयकल्लोळ’ ही दोन्ही नाटके पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे ‘राहे’ या त्यांच्या संस्थेमार्फत करत आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन चित्पावन ब्राह्मण मंडळाने केले आहे.