आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगृहातील मुलीचे अपहरण, चौघांना 7 वर्षांची सक्तमजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील बालगृहातून मुलीचे अपहरण करणाऱ्या चौघांना सात वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सुनावली. याप्रकरणी १४ वर्षीय मुलीने फिर्याद दिली होती.
 
फिर्यादीनुसार, फिर्यादी मुलगी वडील वारल्यामुळे बालगृहात राहत होती. जुलै २०१२ रोजी पहाटे तीन वाजता तिच्या खोलीतील मैत्रीण तिला शौचाला जाण्यासाठी सोबत चल म्हणाली. ती सोबत गेली असता तिथे फिर्यादीला तीन मुले दिसली. त्यामुळे फिर्यादी तिला परत चल म्हणाली तिथून निघण्याच्या तयारीत असताना एका मुलाने फिर्यादीचे तोंड दाबले, तर इतरांनी तिला जबरदस्ती बाहेर काढले बाहेर उभ्या असलेल्या कारमधून तिला नेले. कारमध्ये आधीपासूनच आरोपी बसलेले होते. त्यांनी फिर्यादीचे तोंड दाबून एका घरामध्ये नेले धमक्या देत आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला होता. 

याप्रकरणी नंदू पंढरीनाथ शिरसाठ (१९, रा. उत्तमनगर, जवाहरनगर, औरंगाबाद), किशोर आनंदराव जाधव (१९, रा. अजिंक्यनगर, गारखेडा, औरंगाबाद), जयश्री श्रीनिवास शर्मा (५०, रा. अजिंक्यनगर), किरण वामन चाबुकस्वार (२०, रा. हनुमाननगर, औरंगाबाद) प्रवीण साहेबराव राठोड (२०, रा. अजिंक्यनगर) यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक डी. एन. मुंडे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील अजित अंकुश यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा आरोपींविरुद्ध सिद्ध झाला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद साक्षी-पुराव्यांवरून कोर्टाने नंदू शिरसाठ, किशोर जाधव, जयश्री शर्मा किरण चाबुकस्वार यांना कलम ३६३ अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, तर कलम ३६६ (अ) अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मात्र, सबळ पुराव्याअभावी आरोपी प्रवीण राठोड यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सुनावणीदरम्यान फिर्यादी तिच्या जबाबावरून फितूर झाली. त्यामुळे आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. मात्र अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे सिद्ध झाले त्याआधारे शिक्षा सुनावण्यात आली.
 
बातम्या आणखी आहेत...