आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"तो' मृत्यूच्या दाढेतून परतला, ट्रान्सफॉर्मरमध्ये गेलेला चेंडू काढताना सातवर्षीय मुलाला जबर "शॉक'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ट्रान्सफॉर्मर जवळगेलेला चेंडू काढताना शॉक लागून सातवर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना नारळीबाग येथील त्रिदल अपार्टमेंटजवळ घडली. यश विनोद वाघ असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याच्यावर घाटीत उपचार करून सायंकाळी सुटी देण्यात आली असल्याचे पॉवर हाऊस उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अरुण पाटील यांनी सांगितले.
शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास यश त्याचे मित्र चेंडू खेळत असताना तो ट्रान्सफॉर्मरच्या ओट्यावर जाऊन पडला. यश हा चेंडू काढण्यासाठी तारेच्या कुंपणाला हात लावून पुढे सरकत असताना त्याचा डावा हात एचटी बुशिंग झंपरला लागताच त्याला जबर शॉक लागला तो दूरवर फेकला गेला. लगेच फीडर ट्रिप झाल्याने यश थोडक्यात बचावला. त्यात त्याचा डावा हात भाजला. काही नागरिकांनी त्यास तातडीने घाटीत हलवले.उपचारांनंतर सायंकाळी यशला सुटी देण्यात आली. दरम्यान, मिलिंदनगर उस्मानपुरा येथील खांबात विद्युतप्रवाह उतरून उमेश गौतम वक्ते या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. यास कारणीभूत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे युवा नेते ईश्वर कांबळे, सागर आठवले, गौतम वक्ते, नाथा तांगडे यांनी केली असून मागणीचे निवेदन पोलिस आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...