आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांना ७२५० मेट्रिक टन धान्य वाटप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या धान्य वाटप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत ७२५० मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेमुळे दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबांना आधार मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यभरातील शेतकऱ्यांना एपीएलच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाच किलो धान्य दिले जात आहे. मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना एपीएलच्या माध्यमातून धान्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना रुपये किलो दराने गहू आणि रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येत आहे.

१५ ऑगस्ट रोजी ही योजना सुरू झाली असून सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात ७२५० मेट्रिक टन धान्याचे वाटप झाले आहे. ४३३८ मेट्रिक टन गहू आणि २९१२ मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक वाटप झाले आहे. या योजनेसाठी जिल्ह्याकरिता १३०६ मेट्रिक टन गहू आणि ८७० टन तांदूळ प्राप्त झाला आहे. आतापर्यंत ११३६ मेट्रिक टन गहू आणि ७५६ मेट्रिक टन तांदळाचे वाटप करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या २१७६ मेट्रिक टन धान्यापैकी १८९२ मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एपीएल कार्डधारकांची संख्या एक लाख ३७ हजार १२ असून पाच लाख ६७ हजार सात लाभार्थी आहेत. सर्व लाभार्थींपर्यंत धान्या पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले असून संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दृष्टिक्षेपात धान्य वाटप (मेट्रिक टनमध्ये)
प्राप्त धान्य वाटप धान्य
गहू तांदूळ गहू तांदूळ एकूण
औरंगाबाद १३०६८७० ११३६ ७५६ १८९२
जालना१५७१०५ ४३४ ३०१ ७३५
परभणी३२४४८५ ३९२ २७२ ६६४
हिंगोली३२२२१५ ४७८ ३१८ ७९६
नांदेड५५५३७० ५५५ ३७० ९२५
बीड५१९३४६ ५१९ ३४६ ८६५
लातूर३३३२२२ ३३३ २२२ ५५५
उस्मानाबाद४९१३२७ ४९१ ३२७ ८१८
एकूण४१६८२७७९ ४३३८ २९१२ ७२५०