आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची छेड काढणाऱ्यांना 75 हजार रुपयांचा दंड, 2015 मधील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाविद्यालयीन युवतीचा मोटारसायकलीवरुन पाठलाग करुन छेड काढल्याप्रकरणी, तसेच वर्गात घुसून तिला धमकावल्याप्रकरणी दोन युवकांना न्यायालयाने ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. किरण सुरेश शिंदे विनोद ऊर्फ बाळा रघुनाथ कांबळे अशी आराेपींची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश पी. आर. भावके यांनी शनिवारी दुपारी ही शिक्षा ठोठावली. हा प्रकार डिसंेबर २०१५ मध्ये घडला होता. 

 

चितळे रस्त्यावर राहणारी युवती दादासाहेब रुपवते महाविद्यालयात शिकत होती. आरोपी येता-जाता छेडछाड करायचे, तसेच त्यांनी एकदा वर्गात घुसून तिला मोबाइल नंबर मागितला. तिने नकार दिल्याने चिडून त्यांनी तिचा विनयभंग केला. त्यामुळे मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. 


या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील केदार केसकर यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासले. त्यापैकी वर्गशिक्षक, पीडित मुलीचा जबाब, तिच्या मैत्रीणींनी दिलेल्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सर्व साक्षीपुरावे लक्षात घेता न्यायालयाने दाेन्ही आरोपींना दोषी ठरवले. किरण सुरेश शिंदे याला ५० हजार रुपये विनोद उर्फ बाळा रघुनाथ कांबळे याला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

बातम्या आणखी आहेत...