आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएम साहेब निर्णय घ्या, नाही तर उपोषण; सातवीच्या विद्यार्थ्याने लिहिले पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दप्तराच्या ओझ्यामुळे त्रस्त सातवीतील ऋग्वेद राईकवार याने पत्रकार परिषद घेऊन हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. मात्र, अजून पाऊल उचलले जात नसल्याने त्याने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. ऑक्टोबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत निर्णय झाला नाही तर ऑक्टोबरला नागपूर येथे मुख्यमंत्री बंगल्यासमोर उपोषणाचा इशारा त्याने पत्राद्वारे दिला आहे.

ऋग्वेदने सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवले आहे. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्केच दप्तराचे ओझे राहिले पाहिजे, असे हायकोर्टाचे निर्देश असतानाही अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे त्याने निवेदनात म्हटले होते.

ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना लॉकर्स सुविधा द्याव्यात, अशी मागणीही त्याने केली . अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्याने दिला. ही व्यथा मांडल्यानंतर ऋग्वेदला शाळेत लॉकर देण्यात आले होते.

पाठिंब्यासाठी आवाहन : सर्व विद्यार्थ्यांची या त्रासातून सुटका करण्यासाठी पालकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ऋग्वेदने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...