आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत आठ लाख रुपये जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जळगाव रोडवरील गरवारे गेट नंबर दोनसमोर निवडणूक विभागाच्या पथकाने सायंकाळी ह्युंदाई कारची तपासणी केली. यात आठ लाखांची रोख रक्कम आढळून आली. रकमेचे कोणतेही दस्तऐवज नसल्याने ही ती जप्त करून एमआयडीसी पोलिसांनी वाहनचालकांना अटक केली आहे.

विधानसभेच्या मतदानाला १० दिवस शिल्लक राहिल्याने आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक विभाग व पोलिस प्रशासनाकडून कसून तपासणी सुरू आहे. हर्सूल टी पॉइंट ते सिडको रस्त्यावर ठेकेदार वाल्मीक वामन पाटील यांच्याकडून ८ लाख रुपये जप्त करण्यात आले. पैठणला मित्राला देण्यासाठी रक्कम घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. दरम्यान, उपजिल्हाधिकारी स्वाती कारले यांनी ही रक्कम ९ लाख असल्याचे म्हटले आहे.