आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 People From Ambajogai Died In Accident Near Beed

बीडजवळ अपघातात आठ जण जागीच ठार, दोन जखमी, उभ्या ट्रकला धडकली तवेरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकवर मागच्या बाजुने तवेरा धडकल्याने झालेल्या अपघातात आठ जण जागीच ठार झाले आहेत. बीडजवळ सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत रविवार पेठ अंबाजोगाई येथील रहिवासी होते. हे सगळे जण औरंगाबादला तुरुंगात एका नातेवाईकाला भेटण्यासाठी अंबाजोगाईहून निघाले होते. रस्त्यात जालनारोडवरील पेंडगावजवळच्या एका हॉटेलसमोर पंक्चर झालेला ट्रक (एमएच 25 एम 3547) उभा होता. तवेराचा (एमएच 18 एके 6554) वेग जास्त असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व ती मागच्या बाजुने ट्रकवर जाऊन आदळली. याअपघातात चालकासह आठ जण जागीच ठार झाले. सर्व मृत हे एकाच कुटुंबातील होते.
मृतांची नावे
सय्यद करीम सय्यद अली (37), सय्यद मझहर सय्यद जामअली (48), सय्यद सलीम सय्यद अब्बास (54 चालक), सय्यद सुलतान सय्यक करीम (32), जुबिया अजबोद्दीन शेख (2), सय्यद अलीशा सय्यद करीम (7), सय्यद शहनाज सय्यज सलीम (42), शेख जाबा शेख अजबोद्दीन (37) सर्व राहणार रविवार पेठ अंबाजोगाई.
फोटो - अपघाताचा फाईल फोटो