आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडे तोडणार्‍या 8 जणांना सहा महिने सक्तमजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मौजे रामपूर (ता. औरंगाबाद) येथील गायरान जमिनीवरील झाडे तोडणार्‍या आठ ग्रामस्थांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मनीषा कुलकर्णी यांनी सहा महिने सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.
रामपूर गावातील गट क्रमांक 12 या गायरान जमिनीवर चिंच, लिंब, निलगिरी व आवळा आदी झाडे होती. ही झाडे गावातील नागरिकांनी तोडल्याची फिर्याद महालपिंप्रीचे तलाठी कारभारी गायकवाड यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी रामपूर येथील अविनाश एकनाथ सोनवणे, सुभाष भागाजी पवार, राधा सोनवणे, कडुबाई नामदेव पवार, तुळसा सुभाष पवार, विनायक सोनवणे, इंदू सखाराम पवार, इंदू सोनवणे यांच्याविरुद्ध 16 नोव्हेंबर 2011 रोजी फिर्याद देण्यात आली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सहायक सरकारी वकील रूपाली मेतकेवार यांनी पाच साक्षीदार तपासले. फिर्याद देणारा तलाठी मात्र प्रकरणात फितूर झाला.
न्यायालयाने भादंवि कलम 143, 149 एकत्रित येऊन गुन्हा केल्याबद्दल तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, कलम 147 व 149 नुसार सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, कलम 427 व 149 नुसार एक महिना सक्तमजुरी व प्रत्येकी पाचशे रुपये दंड व वृक्षतोड प्रतिबंधक कायद्याचे कलम 394 नुसार प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.