आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत नव्याने अाठ हजार पदांची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे विकासकामे वा मूलभूत समस्यांचे निराकरण हाेत नसल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अाता दिलासादायक बाब म्हणजे, अाठ हजार पदांची नव्याने निर्मिती असलेला अाकृतिबंध निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात अाले अाहे. महिनाभरात अायुक्तांची मान्यता घेऊन अाकृतिबंध मंजुरीसाठी महासभेवर पाठवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेत १९९७ पासून नाेकरभरतीच झाली नसल्याची खंत नगरसेवक व्यक्त करीत हाेते. दुसरीकडे, मानधनावर साेयीच्या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचाही सपाटा सुरू हाेता. मध्यंतरी स्थायी समितीच्या सभेत महापालिकेमध्ये मानधनावर ९०० कर्मचारी कार्यरत असल्याचे उघड झाले. हे कर्मचारी काेणत्या कालावधीत काेणत्या नियमाखाली भरती झाले, याची चाैकशी करण्याची मागणीही झाली. मानधनावर कर्मचारी घेतले असले तरी कायम तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या वेतनाइतकाच खर्च त्यांच्याही अास्थापनेवर खर्च हाेण्याचा दावा मध्यंतरी उपमहापाैर गुरुमित बग्गा यांनी महासभेत केला हाेता.

ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांना काढून महापालिकेनेच स्वत: कर्मचारी नेमून ठेका चालवावा, अशीही त्यांची मागणी हाेती. दर महिन्याला १५ ते २० कर्मचारी सेवानिवृत्त हाेत असल्यामुळे येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांचा माेठा तुटवडा निर्माण हाेण्याची भीती अाहे. फक्त सफाई कर्मचाऱ्यांचा विचार केला तर जवळपास दाेन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची गरज अाहे. या पार्श्वभूमीवर अाता महापालिका प्रशासनाने ‘ब’ वर्गात समावेश झाल्याचे लक्षात घेत नवीन अाकृतिबंध मंजूर करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले अाहे. प्रशासनाचा अाकृतिबंध जवळपास पूर्ण झाला असून, अायुक्तांच्या अवलाेकनानंतर संभाव्य फेरबदलाद्वारे महासभेवर प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाणार अाहे.

एकूण पदे जाणार १५ हजारांवर
महापालिकेतसध्या सात हजार ८९ कर्मचारी अास्थापनेवर अाहेत. अाता नवीन अाकृतिबंधानुसार हाच अाकडा १५ हजारांपर्यंत जाणार अाहे. जवळपास अाठ हजार पदे वाढण्याची शक्यता लक्षात घेत येत्या काळात स्थानिक भूमिपुत्रांसाठी नाेकरभरतीची सुवर्णसंधी चालून येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...