आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकली चाॅकलेटसाठी दुकानात गेली, दुकानदाराने तिला बेडरूममध्‍ये नेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोटासपार्क परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकानदारास सातारा पोलिसांनी अटक केली. त्याला आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांच्यासमोर हजर करण्यात आले असता त्यांनी गुरुवार १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

एक 8 वर्षाची चिमुकली दुकानात रविवारी दुपारी चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. दुकान मालक प्रमोद गणपत जोशी (५१, रा. शारदांगण, सातारा परिसर) याने दुकानात काम करणाऱ्या मुलांना घरी जाण्यास सांगितले. त्या अल्पवयीन मुलीला गोड बोलत तिला दुकानामागे असलेल्या त्याच्या घरातील बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेली अल्पवयीन मुलगी घरी पळत गेली आणि घडलेली हकीकत सांगितली. त्या मुलीच्या आईने सातारा ठाणे गाठून नराधमाविरुद्ध तक्रार दिली. पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्या पथकाने जोशी यास सोमवारी पहाटे त्याच्या घरातून अटक केली. सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी कोठडीची विनंती केली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, आरोपीचे कृत्‍य..