आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ आरोपींना आठ वर्षांची सक्तमजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गंभीर मारहाणीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ आरोपींना आठ वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी सोमवारी सुनावली. या प्रकरणी मुनिफा शेख कडू (३५, रा. बालानगर, ता. पैठण) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १३ जानेवारी २०११ रोजी आरोपी साहिराबी शेख आसिफ जहागीरदार ही मुनिफाचा पुतण्या शेख मन्नान शेख तय्यब या १४ वर्षांच्या मुलाला काठीने मारहाण करत होती. दीर तय्यब शेख रहीम त्याची पत्नी तेथे आले असता त्यांनाही साहिराबीने शिवीगाळ केली. त्यानंतर १५ जानेवारीला आसिफ आमिर जहागीरदार, शेख मन्सूर सेख गनी, साहिराबी शेख आसिफ जहागीरदार, तैम्मून शेख मन्सूर, सीमा शेख शाकीर, शेख बशीर सेख रशीद, मैमुना शेख बशीर (सर्वरा. बालानगर, ता. पैठण), मैमुनाबी शेख शेख अहमद शेख हुसेन (रा. औरंगाबाद) या सर्वांनी मुनिफा यांच्या घरावर हल्ला करत त्यांना घराबाहेर काढून भररस्त्यावर लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. घरातील दागिने फेकले घर जाळण्याचा प्रयत्न केला. या भीतीने फिर्यादीचा दीर तय्यब शेख रहीम याने विष घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी फिर्यादीने एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. खटल्यावेळी सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी पाच साक्षीदार तपासून गुन्हा सिद्ध केला.