आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारेगावच्या कचरा डेपोसाठी स्मार्ट सिटीतून 80 कोटी; एसपीव्हीच्या बैठकीत निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नारेगाव कचरा डेपोवर प्रक्रिया करण्यासाठी ८० कोटी रुपये देण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र त्यापूर्वी नारेगाव कचरा डेपोचा नव्याने डीपीआर (स्वतंत्र विकास प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे आदेश स्मार्ट सिटीचे मेंटॉर सुनील पोरवाल यांनी मनपा प्रशासनाला दिला. 


स्मार्ट सिटीत मनपाकडून प्राधान्याने पॅनसिटीत घनकचरा व्यवस्थापन हा विषय घेतला आहे. त्यानुसार नारेगाव कचरा डेपो हलविण्यासह शहरातील विविध भागात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. तत्कालीन मेंटॉर अपूर्वा चंद्रा यांनी माहिती घेतली होती. मात्र त्यावर ठोस असे निर्णय घेतले नव्हते. त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. दरम्यान मांडकी आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी आंदोलन करुन मनपाच्या कचऱ्याच्या गाड्या रोखल्या होत्या. त्यामुळे मनपाला कचऱ्याचे गांभीर्य कळाले. त्यानुसार मनपाकडून घनकचरा व्यवस्थापनाचे विविध पर्याय तपासून पाहिले जात आहेत. गुरुवारच्या बैठकीत यावर चर्चा झाली. मनपाला निधी मिळणार असला तरी कचरा डेपो हटविण्यासाठी प्राधान्याने डीपीआर तयार करुन पुढील बैठकीत सादर करावा लागणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...