आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल इन्शुरन्सचे 80 टक्के क्लेम फेटाळले जातात, काळजीपूर्वक पाहा या बाबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मोबाइलही गरजेची वस्तू झाली आहे. कित्येकदा तो गहाळ होणे, पाण्यात पडून खराब होणे वा चोरीला जाण्याचे प्रकार होतात. त्यामुळे अलीकडे लोक त्याचा इन्शुरन्स काढतात. मात्र, इन्शुरन्स काढूनही साधारण ८० टक्के इन्शुरन्स क्लेम कंपन्यांकडून फेटाळले जात असल्याचा विक्रेते, व्यापारी आणि ग्राहकांचा अनुभव आहे. त्यामुळे नवीन मोबाइल घेताना तुम्ही जर त्याचा इन्शुरन्स करून घेत असाल तर काय काळजी घ्यावी यावर विशेष माहिती... 

मोबाइल हरवला वा नादुरुस्त झाला तर आपण लगेच इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम पाठवतो. बहुतांश प्रकरणांत कंपनी क्लेम फेटाळते आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो. कंपन्या क्लेम कुठल्या कारणांमुळे फेटाळतात, आपण क्लेम कोणत्या कारणासाठी करू शकतो, याविषयी वाचा... 

ही काळजी घ्यावी 
- बहुतांश इन्शुरन्स कंपन्यांकडे अन्य कंपन्या एजंट म्हणून काम करतात. या एजंट कंपन्याच ग्राहकांना इन्शुरन्स बनवून देणे, क्लेम मंजूर करणे, फेटाळण्याचे काम करतात. इन्शुरन्स काढताना ग्राहकांनी विमा प्रतिनिधीला याबद्दल सविस्तर माहिती विचारावी, प्रतिनिधी देत असलेल्या माहितीबद्दल कंपनीचे ब्रोशर्स असतील ते पाहावेत खात्री करावी. 
- सर्वप्रथम अटी शर्ती वाचल्या पाहिजेत. यामध्ये कुठल्या कारणासाठी क्लेम करता येईल, कुठल्या कारणाचे क्लेम फेटाळले जातील, क्लेम करण्याची पद्धत, कालावधी दिलेला असतो. यात थोडा वेळ जाईल, मात्र वाचलेच पाहिजे. 
- इन्शुरन्स काढल्यानंतर पॉलिसी क्रमांक असलेली पॉलिसी संबंधित प्रतिनिधीकडून आपल्याकडे घ्यावी. 
- क्लेम करताना तो एजंट कंपनीकडे करण्याऐवजी थेट इन्शुरन्स कंपनीकडेच करावा. 

रोज ग्राहकांचे वाद 
अनेक ग्राहक इन्शुरन्स कंपन्यांच्या अटी, शर्ती व्यवस्थित वाचत नाहीत. जाणीवपूर्वक मोबाइल डॅमेज करून क्लेम करतात. अशा वेळी कंपन्या क्लेम फेटाळतात. यातून रोज ग्राहक आणि कंपन्यांमध्ये वाद होतात. दुकानात येऊन आमच्याशीदेखील ग्राहक वाद घालतात. दिवसभरात एक तरी असा ग्राहक येतो.
-ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, मोबाइल विक्रेते 

अटी, शर्ती समजून घ्या 
इन्शुरन्सकंपन्यांचेप्रतिनिधी बऱ्याचदा ग्राहकांना तोंडी खोटी माहिती देतात. मोबाइलला काहीही झाले तरी ९० टक्के रक्कम मिळेल, असे सांगतात. मात्र, ८० टक्के क्लेम कंपन्या फेटाळतात. त्यामुळे सर्वप्रथम अटी आणि शर्ती बारकाईने वाचूनच इन्शुरन्स काढावा. मी हाताळलेल्या केसेसमधील जवळपास सर्वच ग्राहकांची प्रतिक्रिया अशी होती की, ‘इन्शुरन्स काढलेला बरा.
-अॅड. आनंद मामीडवार 

या कारणाने कंपन्या क्लेम फेटाळतात
खिशातून चोरी जाणे 
उदा. रेल्वेमध्येचढत असताना गर्दीत कुणी तरी खिशात हात घालून मोबाइल चोरला. कंपन्यांच्या मते यात ग्राहकांचा हलगर्जीपणा असतो. 

हलगर्जीपणामुळे चोरी जाणे 
उदा. घरामध्येटेबलवर मोबाइल ठेवलेला होता. तुम्ही मागच्या खोलीत असताना चोरट्याने घरात प्रवेश करून मोबाइल चोरून नेला. कंपन्यांच्या मते यातही ग्राहकांचा हलगर्जीपणा आहे. 

मोबाइल गहाळ झाल्यास 
उदा. प्रवासकरत असताना अचानक लक्षात आले की आपल्या खिशामध्ये मोबाइल नाही. मग पोलिसांत एफआयआरमध्येही गहाळची नोंद होते. 

अन्यव्यक्तीच्या हातातून पडणे 
उदा. मित्रकिंवा अन्य व्यक्तीच्या हातातून मोबाइल खाली पडून फुटला. अशा प्रकरणातदेखील कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात. 

हलगर्जीपणामुळे पाण्यात पडणे 
उदा. मोबाइलखिशात होता. खाली वाकल्यानंतर तो पाण्यात पडला. यात हलगर्जीपणा समोर येतो. 

> थोडक्यात मोबाइलचा इन्शुरन्स काढताना संबंधित इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी आपल्याला फसवत तर नाही ना, हे समजून घेतले पाहिजे. फसव्या बाबी वाटल्या तर त्याबाबत विचारणा लगेच करावी आणि मगच इन्शुरन्स काढावा. 
बातम्या आणखी आहेत...