आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिजोरीत ८३ कोटी, तरीही कामे रेंगाळलेली, ‘दिव्य मराठी’ने पडताळणीत समाेर अाणली वस्तुस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सहा महिन्यांपूर्वी मनपा आयुक्तपदाचा कार्यभार ओमप्रकाश बकोरिया यांनी स्वीकारला. त्यानंतर विकास कामांना वेग मिळेल, अशी पदाधिकारी, नगरसेवकांची अपेक्षा होती. ती प्रत्यक्षात येत नसल्याचे तसेच उत्पन्नवाढीचे पर्याय सुचवूनही त्याची अंमलबजावणी होत नाही, असे महापौर त्र्यंबक तुपे यांचे म्हणणे आहे. प्रमोद राठोड तर राजीनाम्याच्या मन:स्थितीत आहेत. दुसरीकडे बकोरिया यांनी वेळेत बजेट मिळाले नाही, तिजोरीत पैसेच नसल्याने विकासकामे सुरू करता येणार नाहीत, असे म्हटले आहे. प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधींच्या संघर्षात रस्ते, पाणी, पथदिवे, साफसफाईचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकी स्थिती काय आहे, याचा धांडोळा ‘दिव्य मराठी’ने घेतला. कामांच्या स्थितीची पडताळणीही केली. तेव्हा उत्पन्नवाढीच्या, खर्च टाळण्याच्या काही धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी मनपा प्रशासनाने केलीच नसल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे बजेट वेळेत मिळाल्याने विकास कामे रखडल्याचे सांगितले जात असले तरी मनपाच्या तिजोरीत ८२ कोटी ९० लाख रुपये आहे, असेही समोर आले. या पडताळणीचा तपशील असा.

यावर काहीच झाले नाही :
> मोक्याच्या ठिकाणच्या जागा व्यावसायिक दृष्टीने विकसित करून मनपाचे उत्पन्न वाढवा, असे सुचवण्यात आले होते. >मनपाची सभागृहे हाॅल यांना रेडीरेकनरप्रमाणे दर आकारण्याचा हट्ट धरता गरजू संस्था संघटनांना योग्य दरात भाड्याने द्यावे, अशी धोरणात्मक सूचना होती.
>होर्डिंगचे धाेरण तयार केल्यास मनपाच्या उत्पन्नात किमान सात ते आठ कोटी रुपयांची भर पडेल, अशी सूचना होती. >शहरातील फक्त १५ ते २० टक्केच बांधकामांबाबत भोगवटा प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी बिल्डरांना तीन पट दर आकारल्यास हे उत्पन्न सुरू होईल आणि मनपाच्या तिजोरीत किमान १२ कोटी रुपयांची भर पडेल, असे पदाधिकाऱ्यांनी जवळपास प्रत्येक बैठकीत सांगितले.
बातम्या आणखी आहेत...