आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठामध्ये होणार ८५ प्राध्यापकांची भरती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ८५, तर शिक्षकेतरांच्या २९ आणि १२ व्या योजनेतील ११ अशा १२५ जागा भरण्यासाठी तत्त्वत: मंजुरी मिळाली. सोमवारी (२० जून) कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्या वेळी जाहिरातींचा मसुदा मंजूर केला. सहायक प्राध्यापकांच्या सर्वाधिक ३९ जागा असून फंडातून काही जागा भरण्यात येणार आहेत.

बैठकीत एकूण २७ विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये ऐनवेळेवरचे दोन विषय होते. विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या ८५ प्राध्यापकांच्या जागा आता लवकरच भरण्यात येतील. त्यासाठी दोन आठवड्यांतच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. रिक्त ८५ जागांपैकी प्राध्यापकांच्या १८ जागा आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या २८, तर सहायक प्राध्यापकांच्या सर्वाधिक ३९ जागा रिक्त आहेत. त्याशिवाय शिक्षकेतरांच्या २९ जागांसाठीदेखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील अधिकारी आणि ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचाही समावेश आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे अर्ज मागण्याचीही तयारी पूर्ण केल्याचे भरड यांनी सांगितले. त्याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या(यूजीसी) १२ व्या योजनेतील मंजूर ११ पदांसाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक सहायक प्राध्यापकांच्या जागा आहेत. एम.ए. (फुले-आंबेडकर विचारधारा) या अभ्यासक्रमासाठी एका प्राध्यापकाची नेमणूक करण्यात येणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलाॅजी अभ्यासक्रमाच्या संचालकपदासाठी १, याच विभागात केटरिंगच्या सहायक व्यवस्थापकपदासाठी एका पदावर पदस्थापना देण्यात येणार आहे. त्याशिवाय सहायक प्राध्यापकांच्या आठ जागा भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये लिबरल ऑर्ट््स-२, संस्कृत-१, जापनीज-१, फुले थॉट्स-१, आंबेडकर थॉट्स-१, पॉली अँड बुद्धिझम-१, नॅनो टेक्नॉलॉजी-१ आदींचा समावेश आहे. पदवीच्या परीक्षा ऑक्टोबरपासून, तर पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांना २० ऑक्टोबरपासून सुरुवात करण्याच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय नाशिकच्या मराठवाडा विद्यार्थी समितीने मोफत जेवणासाठी दिलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुढील चार महिन्यांसाठी शंभर विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणाची सोय होणार आहे.
एनसीसीच्या दहा गुणांसाठी समिती
एनसीसीच्याकॅडेट्सना दहा अतिरिक्त गुण देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली. त्यामध्ये कॅप्टन सुरेश गायकवाड, डॉ. सुहास मोराळे, मकदुम फारुकी आदींचा समावेश आहे. त्याशिवाय एमएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) एमए (पुरातत्त्व विद्या) हे नवीन विभाग सुरू करण्यालाही बैठकीत मंजुरी मिळाली.
बातम्या आणखी आहेत...